वृत्तविहार : मतदान आणि सुट्ट्या – eNavakal
निवडणूक लेख

वृत्तविहार : मतदान आणि सुट्ट्या

महाराष्ट्रातील उर्वरित मतदार संघातील मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत.म्हणजेच या मतदार संघातील मतदानाचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातले काही महत्वाचे मतदार संघ आणि दिग्गज नेते आपले भवितव्य आजमावतील. परंतु एक महत्वाचा तोटा यावेळी असा होणार आहे की 29 एप्रिलला मतदान असल्याने तोसोमवारचा दिवस अधिकृत सुट्टीचा दिवसच मानला जाईल 28 एप्रिलचा रविवार, 27 एप्रिलचा चौथा शनिवार आणि 1 मेचा महाराष्ट्र दिवस असा सलग सुट्ट्यांचा योग चालून आलेला आहे. त्यातल्या 30 तारखेला कामाचा दिवस असला तरी त्या दिवसाची रजा टाकून अनेक मतदार पर्यटनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी जी सुट्टी घेऊ नये म्हणजेच मतदानासाठी मुंबईतच थांबावे असा आग्रह सर्व बाजूंनी केला जात आहे.

प्रचार, प्रसार माध्यमांमधून वारंवार त्याची आठवणही करून दिली जात आहे. तरीदेखील मुंबईसारख्या सतत कामात व्यग्र असलेल्या किंवा काम करून कंटाळलेले लोक कितपत या सुट्टीच्या काळात मुंबईत राहातील याबद्दलशंका आहे. दुसरा तोटा म्हणजे हे मतदान सुट्टीच्या काळात होत आहे. मुंबईतल्या एकूण लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के लोक हे परप्रांतीय आहेत असे म्हटले तरी चालेल. रेल्वेच्या आरक्षणाच्या आकडेवारीप्रमाणे यापूर्वीच वीस लाख लोक मुंबईच्या बाहेर गेले आहेत. आरक्षण करून गेलेल्यांची ही आकडेवारी आहे. याशिवाय आरक्षण न करता जाणाऱ्यांची संख्या यापेक्षाही दुप्पट पाचपट असू शकते. म्हणजे जवळपास पन्नास लाखलोक मुंबईच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी ही पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यानच राहील, हे सांगण्यासाठी वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरजही वाटत नाही. यावरून लोकशाहीचा जो तथाकथित महोत्सव सध्या सुरु आहे त्यात लोकांच्या उदासिनतेचाही इतका मोठा जल्लोष दिसून येतो. अन्यथा मुंबईसारख्या विकसित किंवा सुशिक्षित महानगरीतून तीस चाळीस लाख लोक मतदानाच्यादिवशी मुंबईबाहेर गेले नसते.

एवढेच कशाला ज्या पुण्याला सांस्कृतिक महानगरी म्हणून ओळखले जाते किंवा शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. तिथेसुध्दा फक्त पन्नास टक्के मतदान झाले आहे. यावरून लोकांमधला सुशिक्षितपणा हा लोकशाहीच्या मूळ उद्दीष्टांना कितपत पूरक आहे, याबद्दल शंका उपस्थित होते. लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता असे ज्याचे वर्णन होते. त्याच निवडणुक प्रक्रियेत फक्त पन्नास टक्के लोक सहभागी होत असतील तर लोकांनी लोकांकरीता दुर्लक्षित केलेली व्यवस्था असे हे त्याचे नाईलाजाने वर्णन करावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More