वृत्तविहार : भारताचा ब्रेन ड्रेन सुरुच               – eNavakal
लेख

वृत्तविहार : भारताचा ब्रेन ड्रेन सुरुच              

भारतातील तरूणांचा ब्रेन ड्रेन रोखण्याकरीता सरकारने कोणत्याही विशेष उपाययोजना केलेल्या नाहीत कारण प्रामुख्याने अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांच्या संख्येमध्ये कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरामध्ये अमेरिकेला शिक्षण आणि  जाणाऱ्या तरूणांची संख्या दीड पटीने वाढल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. खरे तर अमेरिकन सरकारने व्हीसा देण्याच्या संदर्भात कडक धोरण स्वीकारले असतानाही या संख्येत लक्षणीय घट झालेली दिसत नाही. आता पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी नवीन नियम करून भारतातून प्रशिक्षित झालेल्या तरूणांनाच व्हीसा देण्याचे धोरण आखले आहे. म्हणजेच अमेरिकेला आवश्यक असलेल्या कौशल्यप्राप्त तरूणांनाच अमेरिकेत प्रवेश मिळेल असा त्याचा स्पष्ट संकेत आहे. स्थानिक अमेरिकन तरूणांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये आणि तिथल्या कंपन्यांना प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध व्हावेत हा त्यामागचा मुख्य हेतू दिसून येतो. आपल्या देशाला काय हवे आहे आणि काय नको याची वेळोवेळी काळजी घेऊन व्हीसा धोरणामध्ये बदल करण्याचे काम तेथील सरकार करू शकते. अशावेळी भारतातच प्रगत शिक्षण घेतलेल्या तरूणांना आपल्याच देशात संधी कशी मिळू शकेल याचा विचार आपले सरकार का करू शकत नाही याचे आश्चर्य वाटते.

तरूणांची सर्वाधिक संख्या असलेल्या भारतात प्रशिक्षित किंवा उच्चशिक्षित तरूणांची संख्याही तितकीच मोठी आहे. त्यांच्या या बुध्दीमत्तेचा आणि गुणवत्तेचा योग्य तो वापर करून घेण्याचे कौशल्य जर सरकार दाखवू शकत नसेल तर कौशल्यआधारित तरूणांची अशीच परवड होत राहील असे म्हणणे भाग पडते. एकीकडे मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया किंवा स्टँड अप इंडियासारख्या योजना सुरु करूनही भारताबाहेर जाणाऱ्या तरूणांची संख्या कमी होत नसेल तर आपण कधीही आपला ब्रेन गेन करू शकत नाही. आज जगातील सर्वाधिक विद्यापीठे भारतात आहेत. या विद्यापीठांमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्यांची संख्यादेखील सर्वाधिक आहे. याचा अर्थ भारतात शिक्षणाच्या केवळ फॅक्टऱ्या आहेत. पण विविध प्रकारचे संशोधन करून किंवा नवनवीन उत्पादन करणाऱ्या फॅक्टऱ्या उभे करणारे तरूण इथेच थांबायला तयार नाहीत ही अतिशय विचित्र परिस्थिती म्हणावी लागते. भारताचा हा ब्रेन ड्रेन थांबवण्याकरीता स्वतंत्र मंत्रालयच निर्माण करण्याची वेळ आवश्यकता आहे. कारण अमेरिकेसारखा देश, शिक्षण बुध्दीमत्ता, स्थानिक तरूणांचा रोजगार आणि स्थानिक उद्योग यांचा एकत्रितपणे विचार करून आपल्या देशाचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. तर महत्वाकांक्षा घेऊन शिक्षण घेणारा भारतीय तरूण अमेरिकेत जाण्याची आकांक्षा ठेवतो. आणि सरकारही त्याला जाऊ देते. म्हणजेच त्यातरूणांसाठी काही करीत नाही हा मोठाच दैवदुर्विलास म्हणावा लागतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More