वृत्तविहार : बेस्टविषयीची अक्षम्य उदासिनता – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : बेस्टविषयीची अक्षम्य उदासिनता

मुंबईतला जीवंतपणा तिथल्या वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून आणि जर ही वाहतुक व्यवस्था ठप्प झाली तर मुंबई ठप्प होते. हे बेस्टच्या संपाने दाखवून दिले. जवळपास पन्नास लाख प्रवासी रोज बेस्ट बसचा वापर करतात. त्यांना दुसरा पर्याय नाही तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग ठरतो. इतकी महत्वाची वाहतुक व्यवस्था किंवा परिवहन व्यवस्था कार्यक्षम राहावी आणि त्यात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना खरे तर तक्रारीची संधी मिळू नये. अशा प्रकारची मानसिकता गरजेची असताना मुंबईतल्या बेस्ट उपक्रमाला अक्षरशः खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कामगारांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. पगारवाढीपासून त्यांच्या गणवेशापर्यंतचे किंवा तिकीट वेंडिंग पर्यतचे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात याबद्दल तक्रारी केल्या गेल्या वेतनवाढीबद्दल चर्चाही केल्या गेल्या परंतु बेस्ट प्रशासन आपल्या भूमिकेपासून ढिम्म हलले नाही. बेस्टची ही दूरावस्था पाहून जिच्याकडे तिचे पालकत्व आहे त्या महापालिकेने मदतीचा हात देणे अपेक्षित होते. पण महापालिका आयुक्तांनीसुध्दा बेस्ट उपक्रमापेक्षाही मुंबईकरांच्या गरजेचे महत्व लक्षात घेतले नाही. आणि म्हणून आज बेस्ट उपक्रम मोडकळीला अवस्थेत येऊन पडलेला आहे. अशा परिस्थितीत बेस्ट कामगार संघटित होऊन काही निर्धार करीत असतील. आणि आपल्या मागण्यांची तड लावून घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना सगळ्याच मुंबईकरांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांचा हा संप केवळ स्वतः पुरता नाही तर मुंबईतल्या चाकरमान्यांना उपयुक्त ठरणारी बेस्ट वाचवण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेचे कौतुक केले जात असते. पण या श्रीमंत महापालिकेचा एक मोठा उपक्रम दरिद्री अवस्थेत असेल तर तो त्या तथाकथित श्रीमंतीचाच अपमान ठरतो. गेल्या दोन वर्षापासून बेस्ट उपक्रम वाचावा तो सशक्त व्हावा म्हणून महानगरातल्या मान्यवरांनी पुढाकारही घेतलेला आहे. तरीदेखील कोणतीच सुधारणा होत नसेल तर व्यवस्थापनाच्या हेतूबद्दलच शंका येऊ लागते. कामगारांना आपली नोकरी धोक्यात यावी किंवा संघर्ष करण्याची गरज पडावी असे कधीही वाटत नसते. सर्व प्रकारचे प्रयत्न थकतात तेव्हा नाईलाजाने संप किंवा इतर आंदोलनांचा मार्ग स्वीकारावा लागतो. महापालिकेच्या लक्षात ही गोष्ट येत नसल्यामुळेच कर्मचारी संघटनेच्या काही कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाच्या दारातच आंदोलन केले जेणेकरून राज्य सरकारला तरी याबाबत काही जाणीव व्हावी. शेवटी प्रशासनाला झुकावे लागेलच आणि तोडगा काढावा लागेलच यात काही शंका नाही. परंतु मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या वाहतुक व्यवस्थेबाबत बेस्ट आणि महापालिका प्रशासन यांच्यात असलेली उदासिनता अत्यंत निषेधार्ह ठरते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More