वृत्तविहार : बिबट्यांचा वाढता धुमाकुळ – eNavakal
लेख

वृत्तविहार : बिबट्यांचा वाढता धुमाकुळ

नाशिकमध्ये सावरकर नगर परिसरामध्ये म्हणजे भर वस्तीत बिबट्या घुसला. आणि दिवसभर तो नाशिककरांसाठी चर्चेचा विषय राहिला.एकूणच नाशिकमध्ये बिबट्याचा हा थरार पहिल्यांदाच घडला असावा. अनेकांना असे आश्चर्य वाटले की एवढ्या भर गावामध्ये बिबट्या आला कसा. परंतु गावच जर आता जंगलामध्ये घुसू लागले असेल तर बिबट्याने तरी काय करायचे. असा प्रश्न निर्माण होतो. महानगरांचा विस्तार इतक्या वेगाने होतो आहे.
की त्याच्या आजुबाजूला असलेली जंगलेसुध्दा आता या महानगरांमध्ये समाविष्ट होऊ लागली आहेत. हाच प्रकार केवळ नाशिकबाबत नाही तर अनेक महानगरांबाबत घडताना दिसून येतो. अगदी पुणे, कोल्हापूर, नागपूर याठिकाणीसुध्दा बिबट्याचे थरार होऊन गेले आहेत. मुंबई , ठाणे, नवी मुंबईसाठी हा प्रकार काही नवीन राहिलेला नाही. याचा अर्थ जी जागा जंगलांसाठी राखीव होती तिथे आता माणसांनी अतिक्रमण केल्याने या शहरांमध्ये आता प्राणी आक्रमण करू लागले आहेत. एक बिबट्या घुसल्यानंतर तो हमखासपणे काही जणांना जखमी करतो. त्याला पकडण्याची व्यवस्था फक्त वनविभागच करू शकत असल्याने हा बिबट्या असेपर्यंत नागरिकांची जी तारांबळ उडते ती अक्षरशः जीवाचा आकांत दर्शवणारी असते. आणि ते स्वाभाविकही आहे. कोणतीही कल्पना नसताना भलेमोठे हे जनावर जेव्हा समोर उभे ठाकते त्यावेळेला कोणाचीही पाचावरच धारण बसेल. प्रश्न आता एवढाच आहे की गेल्या वर्षदीडवर्षातले बिबट्या घुसण्याचे प्रकार सातत्याने घडत असतील तर त्याच्या बंदोबस्ताचाही तितक्याच गांभिर्याने विचार व्हायला हवा. आणि याकरीता केवळ वनविभागावर अवलंबून राहाण्याची वेळ येणार नाही. अग्नीशमन दल किंवा अनेक शहरांमध्ये आता अस्तित्वात आलेले आपत्ती व्यवस्थापन या यंत्रणांनाही याबाबतचे प्रशिक्षण दिले पाहिजे. एवढेच नव्हे तर नागरिकांनीसुध्दा अशा प्रसंगी काय काय खबरदारी घ्यावी याची सूचना द्यायला हवी. अजूनपर्यंत तरी फार मोठा विपरित प्रकार घडलेला नाही. परंतु त्याची वाट पाहाण्याचीही गरज नाही. खरे तर प्राण्यांविषयी अभ्यास करणारे प्राणीमित्र बऱ्याच संख्येने आहेत. त्यांनादेखील याबाबतीत सहभागी करून घेता येईल. खरे तर यापूर्वीच याबाबतचा अभ्यास पाहायला हवा होता. वनविभागाकडून त्याची विशेष माहिती लोकांसाठी दिली जाणे गरजेचे होते. परंतु आपल्याकडे सरकारी कारभार कधी इतका तत्पर नसतो. ज्यावेळी बिबट्याकडून दोन चार बळी घेतले जातील तेव्हा सरकार जागे होईल. तेव्हा सरकारी यंत्रणा कामाला लागतील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More