वृत्तविहार : फेसबुकचा चेहरा बदलणार – eNavakal
लेख

वृत्तविहार : फेसबुकचा चेहरा बदलणार

जगातील सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन करू शकणारी किंवा जगातल्या प्रत्येक व्यक्तीची कुंडली आपल्यासोबत ठेवणारी फेसबुक ही कंपनी आता आपला तोंडवळ बदलण्याच्या तयारीत आहे. फेसबुककडून त्यांच्याकडे जमा होणाऱ्या माहितीचा गैरवापर होतो. किंवा फेसबुक वापरत असताना लोक एकमेकांमध्ये जी माहिती शेअर करतात. त्यात गोपनियता राहत नाही. अशा प्रकारची चर्चा गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत गोपनियतेचा फेसबुककडून भंग झाल्याचाही आरोप केला गेला एवढेच नव्हे तर भारतासारख्या देशानेदेखील अनेक प्रकारची माहिती चुकीच्या पध्दतीने वापरली जात असल्याचा आरोपही केलेला आहे. या सगळ्या टीकेनंतर कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकीय संसदेपुढे बोलवण्यात आले होते आणि त्यांच्याकडून गोपनियता कशी टिकून राहील. अशा प्रकारे सुधारणा करण्याचे आदेश दिले गेले होते. आता झुकरबर्ग यांनी स्वतःच ट्विट करून फेसबुक आता या स्वरुपात न राहता खाजगी मेसेंजरच्या स्वरुपात आपले परिवर्तन करू इच्छिते. म्हणजेच काही प्रमाणात
व्हॉट्सअॅपप्रमाणे फेसबुकचे काम सुरु होईल. त्यातील माहिती प्रत्यक्ष कंपनीलाही उपलब्ध होणार नाही. विशिष्ट कालावधीनंतर त्यातली माहिती नष्टही होऊ शकेल. यामुळे फेसबुकला आणखी मोठी बाजारपेठ मिळेल. मेसेंजर सर्व्हिसमुळे त्याचा वापर अधिकाधिक लोक करू शकतील आणि आज अनेक देशांमधून होत असलेली टीकाही थांबवता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेसबुकवरची माहिती लीक होते किंवा त्याचा गैरवापर होतो. हे स्पष्ट झाल्यानंतर फेसबुकची लोकप्रियताही हळुहळू घसरत चालली होती ती सावरून धरण्यासाठीसुध्दा फेसबुकला नवीन उपाययोजना करणे क्रमप्राप्त होते. नव्या तंत्रज्ञानासह लोकांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे आणि कंपनीचा व्यावसायिक पाया भक्कम करणे अशी आमची उद्दीष्टे असल्याचे झुकरबर्ग यांनी एका ट्विटमधून स्पष्ट केले आहे. याचा अर्थ जगभरातील अनेक देशातील सरकारांचे दडपण प्रत्येक व्यक्तीच्या माहितीची गोपनियता आणि व्यवसायाची आर्थिक स्थिती या तीनही गोष्टी सांभाळण्याकरीता झुकरबर्ग यांना हा नवा पर्याय निवडावा लागलेला आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांनी मिळवलेले स्थान वैशिष्टय़पूर्ण आहेच. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्या व्यवसायाचे स्वरुपही बदलण्याचे प्रयोग या कंपन्यांना करावे लागतात. आता लोकांना फेसबुकच्या नव्या चेहऱ्यामोहऱ्याची उत्सुकता आहे. हा बदल नेमका कधीपासून होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु फेसबुकचा तोंडवळा बदलेल आणि फेसबुक स्वतःची लोकप्रियता टिकवेल यात काही शंका दिसत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More