(वृत्तविहार) पंधरा डब्यांच्या गाड्या तात्पुरती सोय – eNavakal
लेख

(वृत्तविहार) पंधरा डब्यांच्या गाड्या तात्पुरती सोय

मुंबईत आता सगळ्याच गाड्या पंधरा डब्यांच्या केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली आहे. मुंबईची एकूणच गर्दी कमी करण्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यापैकी ही एक उपाययोजना म्हणावी लागेल. परंतु प्रश्न असा आहे की, रेल्वेकडे उपनगरीय प्रवासासाठी मर्यादित जागा आणि मार्ग आहेत? या मार्गांवरून कितीही संख्येने आणि कितीही लांब डब्यांच्या गाड्या जरी चालवल्या तरी फार मोठा फरक पडणार नाही. केवळ तात्पुरता दिलासा म्हणूनच या उपाययोजनेकडे पाहता येईल. सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेचा वापर करणाऱ्यांची संख्या ऐंशी लाखाच्या घरात आहे. ही आकडेवारी थक्क करणारी ठरते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एकाच महानगरातील उपनगरीय वाहतुक इतक्या प्रचंड संख्येने प्रवाशांची ने-आण करत असेल असे वाटत नाही. आणि त्या प्रवाशांना सतत गैरसुविधेत ठेवणारे सरकारही बहुतेक एकमेवच असावेत. संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वेचा इतक्या गांभिर्याने विचार केला पाहिजे की कोणाही प्रवाशाला केवळ गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागला अशी वेळ त्याच्यावर येता कामा नये. एकीकडे सरकार किंवा रेल्वे मंत्रालय रेल्वेचे जाळे विस्तारताना दिसून येते. आता तर थेट उरणपर्यंत रेल्वे जाणार आहे. मुंबई महानगराची मुख्य अडचण अशी आहे की, बाहेर जाऊन येणाऱ्या गाड्यांची संख्या आणि उपनगरीय गाड्यांची संख्या यांच्यात मेळ बसत नाही. आणि एकाच मार्गावरून या दोन्ही प्रकारच्या गाडय़ा मुख्य स्थानकापर्यंत जात असतात. म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
किंवा चर्चगेटला जाण्याकरीता दोन चार समांतर एकाच दिशेने जाणारे रेल्वे मार्ग आवश्यक आहेत. तिथे फक्त जलद आणि धिम्या गतीचे दोन दोनच मार्ग उपलब्ध आहेत. म्हणजेच मार्गांची संख्याही तेवढीच राहाते. परिणामी गाड्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येते आणि मग त्याचा सगळा भार हा आहे त्या गाड्यांमध्ये गर्दी कोंबण्यात दिसून येतो. म्हणूनच मुंबईतली जागेची मर्यादा लक्षात घेऊन आहे त्याच मार्गावर उन्नत मार्ग उभारणे जास्त संयुक्तिक ठरू शकते. मध्यंतरी दुमजली लोकल्स सुरु करण्याचीही मागणी झाली होती. या पर्यायाचीही चाचणी घ्यायला हरकत नाही. म्हणजे निदान आहे त्याच मार्गावरून दुप्पट प्रवाशांची ने आण होऊ शकेल. फक्त यामुळे स्थानकांमध्ये होणारी गर्दी आणि ही दुमजली लोकल प्रत्येक स्थानकात थांबण्याची वेळ याचाही विचार करावा लागेल. या सगळ्या
मुद्दांचा विचार केला तर पंधरा डब्यांच्या गाड्या वाढवणे ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More