वृत्तविहार : न्यायालयांनी मर्यादित भूमिका ठेवावी     – eNavakal
लेख

वृत्तविहार : न्यायालयांनी मर्यादित भूमिका ठेवावी    

न्यायालयांनी अनेक वादग्रस्त विषयांबाबत निर्णय घेतले आहेत. परंतु सरकार जिथे कमी पडते तेव्हा जे निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असते. तिथे सरकार आपली क्षमता दाखवू शकत नाही परिणामी असे निर्णय न्यायालयात पाठवले जातात हे प्रकार आता इतके वारंवार होऊ लागले आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. याचा अर्थ सरकार आपली जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्याठिकाणी न्यायालयांना ती पार पाडावी लागते म्हणजेच एकाअर्थी सरकारच्या निकम्मेपणावरच न्यायमूर्तींनी टीका केली आहे. दिल्लीतील एका व्याख्यानमालेत बोलताना चंद्रचूड यांनी हे विधान केले.

न्यायालयांवर जबाबदारी ढकलणे हे आता नित्याचेच झाले आहे. अशा शब्दात त्यांनी केलेली ही टीका गांभिर्याने घेतली पाहिजे. कारण समलैंगिक संबंधांविषयी निर्णय देताना हा प्रामुख्याने कायदेशीर आणि संविधानिक भाग होता जो सरकारी पातळीवर सोडवला जाऊ शकला असता. कारण त्यातला हा संघर्ष कायद्याशी निगडीत असल्याने सरकारने अनेक कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा होता अशी अपेक्षा त्यांच्या या विधानातून दिसून येते. याचा दुसरा अर्थ असा होतो की न्यायालयांकडे अनावश्यक अशा याचिका येतात. आणि त्यात त्यांचा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ जातो अशावेळी जे निर्णय सरकारने करणे आवश्यक आहे ते न्यायालयांनी स्पष्ट शब्दात सांगितले पाहिजे. किंबहुना सरकारला जाणीव करून दिली पाहिजे. सरकार करीत नाही. म्हणून ती जबाबदारी न्यायालयाने घेणे हा पायंडादेखील एकाअर्थी चुकीचा ठरतो.

सरकारची स्पष्ट शब्दात कानउघाडणी करण्याचे स्वातंत्र्य न्यायालयाला आहे. जे काम न्यायालयांचे नाही ते करण्यातच या महत्वपूर्ण संस्थेचा वेळ आणि शक्ती खर्च होऊ शकते. आणि मग असे अनेक विषय न्यायालयापुढे येऊ शकतात. ज्याप्रमाणे राम जन्मभूमीचा वाद दोन्ही धर्माच्या लोकांनी एकत्र बसवून चर्चेतून सोडवावा अशी अतिशय विधायक सूचना किंबहुना आदेश याच न्यायालयाने यापूर्वी दिला होता. आणि तसा प्रयत्न आता केंद्र सरकारकडून सुरू आहे. ज्याला ज्युडिशिअल अक्टीव्हिझम म्हणता येईल तो प्रकार न्यायालयाकडून होता कामा नये. लोकशाहीमध्ये प्रत्येक संस्थेने आपापले काम चोख बजावले पाहिजे. आणि आपणच लोकशाहीचे तारणहार आहोत असा अहंकारही निर्माण होऊ देता कामा नये. खरे तर समाजातील प्रत्येक घटकाच्या जबाबदारीचा विवेक जागृत ठेवण्याचे काम न्यायालयांनी केले तरीदेखील त्यांनी खूप मोठे कार्य केले असे म्हणता येईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More