वृत्तविहार : निवडून येण्यापेक्षा तिकीटासाठी लढाई – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : निवडून येण्यापेक्षा तिकीटासाठी लढाई

लोकसभा निवडणुकीला अजून आठ महिन्यांचा कालावधी बाकी असताना तिकीट इच्छुकांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. विशेषत: भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून येण्यापेक्षाही तिकीट मिळवणे या गोष्टीला जास्त महत्त्व दिले जात आहे. याकरीता सर्व प्रकारचे उपाय योजण्याचा किंवा आवश्यक ती फिल्डिंग लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

विशेषत: महाराष्ट्रात भाजपाच्या विद्यमान खासदारांनी पुन्हा आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. याशिवाय पक्षश्रेष्ठींवर ज्यांचा दबाव पडू शकतो अशा उद्योगपतींनाही हाताशी धरून आपले पारडे वजनदार कसे आहे हेही दाखवण्याचीही स्पर्धा दिसून येत आहे. परंतु पक्षपातळीवर खासदारांच्या कामगिरीचा लेखोजोखा घेतला गेला. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त खासदार अनुत्तिर्ण झाल्याचे सांगितले जाते. कारण यावेळी 2014 सारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यावेळी केवळ मोदींच्या नावावर मतदान केले आता मात्र आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जर त्या पात्रतेचा नसेल तर त्याला पुन्हा मत द्यायचे की नाही याचा विचार लोकांनी सुरु केलेला आहे. कामगिरीचा आढावा ही गोष्ट पक्षासाठी महत्वाची असली तरी मतदारांचा कौल हादेखील तितकाच महत्वाचा ठरतो. परिणामी अनेकांना निवडून येणे हे सोपे वाटत असते. तरी मतदारांकडून काम न करणाऱ्यांना पुन्हा निवडून दिली जाण्याची शक्यता वाटत नाही. आपल्या कामगिरीचा कोणताही विचार न करता केवळ तिकीट मिळवण्याच्या मोहीमेमध्ये आतापासूनच गुंतलेले हे विद्यमान खासदार या पहिल्याच कसोटीमध्ये कितपत यशस्वी होतील याबद्दल शंकाच आहे. जी परिस्थिती भाजपात आहे तीच दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेतही पाहायला मिळते. 2014 सारखी परिस्थिती नसल्याने आपणही भाजपाचा पराभव करू शकतो असा आत्मविश्वास अनेकांमध्ये निर्माण झाला आहे आणि तिथेसुध्दा निवडून येण्याच्या निकषापेक्षाही किंवा क्षमतेपेक्षाही तिकीट मिळवणे या गोष्टीलाच प्राधान्य दिले जात आहे.

लोकशाहीसारख्या भारतात लोकांच्या मतदानाला किंवा लोकांचा कौल या गोष्टीला किंमत न देता आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळवणे म्हणजेच आपल्या विजयाची हमी असल्याचे मानणे ही गोष्ट धक्कादायक ठरते. कारण गेल्या तीस चाळीस वर्षातले राजकारण प्रचंड बदलले आहे. तिकीट मिळवण्यापासून ते जिकून येण्य़ापर्यंत प्रचंड प्रमाणात होणारी आर्थिक देवाणघेवाण प्रत्यक्ष मतदानाचेच स्वरुप बदलवणारे ठरले आहे. जो जास्तीत जास्त धनवान त्याच्या बाजूने मतदान ही गोष्ट आता चांगलीच रुढ झालेली आहे आणि या निकषावरच तिकीट पदरात पाडून घेण्यासाठीसुध्दा लॉबींग सुरु झालेले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More