वृत्तविहार : निवडणुक आणि महाराष्ट्राचे अर्थकारण – eNavakal
लेख

वृत्तविहार : निवडणुक आणि महाराष्ट्राचे अर्थकारण

महाराष्ट्राचे देशातील आर्थिक स्थान हा मुद्दा या लोकसभा निवडणुकीतही महत्त्वाचा ठरला पाहिजे. कारण आर्थिक राजधानी म्हणत असताना ही राजधानी ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्राची तितकीच मोठी आर्थिक कोंडी नेहमीच केली जाते. कारण सर्वाधिक आयकर या आर्थिक राजधानीतून केंद्राला दिला जातो. एवढेच नव्हे तर देशातील सर्वाधिक परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन रोजगार कमवत असतात. दुर्दैव असे आहे की त्याच महाराष्ट्रातील तरूणांना आपल्या रोजगारासाठी आरक्षण मागावे लागते. त्याकरीता लाखोच्या संख्येने मोर्चे काढावे लागतात. याचा अर्थ या प्रगत राज्यात उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत हे इथल्या भूमीपूत्रांकडे नाहीत किंवा त्यांच्या रोजगाराच्या उद्योग व्यवसायाच्या मुद्दाने राज्य आणि केंद्राकडून तितके प्राधान्य दिले जात नाही असा त्याचा अर्थ निघतो. आर्थिक राजधानी म्हणायचे आणि इथल्या मराठी माणसाने रोजगारासाठी कटोरा फिरवायचा इतका विचित्रपणा जगाच्या कोणत्याही देशामध्ये घडत नसावा. म्हणूनच या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे अर्थकारण कसे असेल यावर चर्चा झाली पाहिजे. आपला लोकप्रतिनिधी निवडून देताना त्या प्रतिनिधीजवळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे कोणते मुद्दे आहेत किंवा त्या लोकप्रतिनिधींचा त्यासंदर्भात काय अभ्यास आहे. हे मतदारांनी तपासले पाहिजे. 2014 साली निवडणुक झाली. त्यावेळी नवीन येणारे सरकार नोटबंदीसारखा निर्णय घेऊन लोकांची आर्थिक नाकेबंदी करेल असे कोणालाही वाटले नव्हते. गेली पाच वर्षे देशात सर्वाधिक चर्चा अर्थकारणावर झाली आहे. विकास, विकास , विकास असा सारखा धोषा लावून सरकारने किती प्रचंड कामे केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्याचे प्रत्यक्ष अनुभव लोकांना पाहायला मिळाले नाहीत. महागाई कमी झाली. घरांच्या किंमती कमी झाल्या. काही ठिकाणी पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले गेले. या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी जर मनासारखा रोजगार मिळाला नसेल, सामान्य माणसाच्या उत्पन्नात वाढ झाली नसेल तर त्या विकासाला काही अर्थ उरत नाही सरकारी योजनांचे पैसे थेट त्या माणसाच्या खात्यात जमा केल्याने भ्रष्टाचार कमी झाला. गॅस सिलेंडरसारखी गोष्ट विना रांगेशिवाय मिळू लागली. हादेखील जनतेला दिलासा वाटू शकतो. परंतु रोजचा महिन्याचा खर्च भागवण्याकरीता पुरेसा रोजगार मिळणे ही त्यातली तितकीच महत्त्वाची बाब ठरते. सरकारी नोकऱ्या रिकाम्या असूनही भरल्या गेल्या नाहीत. जेव्हा राज्यामध्ये लाखो तरूणांचे मोर्चे निघाले त्यावेळेला सरकारने सत्तर हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला. जर हे मोर्चे निघाले नसते तर या जागाही भरल्या गेल्या नसत्या. एकट्या रेल्वे खात्यात 90 हजार जागा रिकाम्या होत्या आता त्या हळूहळू भरल्या जात आहेत म्हणजेच ही निवडणुक आणि महाराष्ट्राचा आर्थिक विकास या गोष्टींना किती महत्त्व आहे हे सहज लक्षात येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More