वृत्तविहार – निवडणुकीनंतरचे आडाखे आणि आखाडे – eNavakal
Uncategoriz

वृत्तविहार – निवडणुकीनंतरचे आडाखे आणि आखाडे

निवडणुकीतील आश्वासने देऊन सगळेच राजकीय पक्ष सुशेगात बसले आहेत गोव्यातल्या कोकणी भाषेत आरामशीरपणाला सुशेगात असे म्हटले जाते. प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने आडाखे बांधण्यामध्ये मग्न झालेले आहेत. निवडणुकीचा पाचवा आणि सहावा टप्पा पुढच्या दोन आठवड्यामध्ये संपेल. उशिरात उशिरा 24 मेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे. परंतु ज्याठिकाणचे मतदान पार पडले आहे तिथल्या ज्या उमेदवारांना आपण निवडून येऊ अशी आशा वाटते त्यांनी आपले भविष्यातले प्लॅनही आखायला सुरुवात केली आहे.

सत्ताधारी पक्षातल्या बऱ्याचजणांनी आपण निवडून येऊ हे गृहित धरून मंत्रीपदाचे आराखडे बांधायला सुरुवात केलेली दिसते. राजकारणात असलेला माणूस हा महत्वाकांक्षीच असावा लागतो यात काही वाद नाही. आणि मग आपलीही महत्वाकांक्षा पूर्ण करण्याकरीता अगदी स्वपक्षीयांशीही राजकारण खेळण्याचा त्यांचा सराव चालूच राहतो. कारण निवडून येणाऱ्यांपैकी कोणाची कशी वर्णी लागेल हे सांगता येत नाही परंतु आपली पात्रता सिध्द करण्याकरीता काय काय प्रयत्न करायला हवेत. याची रंगीत तालिम अनेक उमेदवारांनी सुरु केलेली दिसून येते. सगळ्यांनाच मंत्री होता येईल असे नाही. परंतु जेव्हा मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावू तेव्हा राज्यमंत्रीपदावर किंवा एखाद्या मंडळावर एखाद्या समितीवर तरी वर्णी लागू शकेल असा त्यामागचा हेतू असतो. खर्च झालेला पैसा भरून काढण्याचेदेखील अंदाजपत्रक अनेक उमेदवार तयार करतात त्यांना ते गरजेचेही असते.

थोडक्यात सांगायचे तर राजकारण आणि डावपेच ही कधीही थांबणारी प्रक्रिया म्हणावी लागते. म्हणजे तिकीट मिळवण्याकरीता डावपेच खेळायचे निवडून येण्याकरीता शहकाटशह खेळायचे. आणि निवडून आल्यानंतर अगदी आपल्याच पक्षातील दोस्तांच्याविरुध्दही कुरघोड्या करीत राहायचे. असा हा न संपणारा खेळ आहे. विशेषतः हेसगळे डावपेच रात्रीच खेळले जातात आणि म्हणूनच राजकारण्यांचा हा रात्रीस खेळ चाले असेच त्याचे स्वरुप असते. सामान्य माणसाला  या सर्व गोष्टींची तेवढी कल्पना येत नाही. अगदी राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांनासुध्दा आपल्या समोर बसलेला राजकारणी कोणता हेतू मनात ठेवून बोलतो आहे हे तितक्या सहजपणाने लक्षातही येत नाही. म्हणून लक्षपूर्वक त्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. ते ज्यावेळेला एका विशिष्ट मुद्यावर जोर देत असतात त्यावेळी ते त्यांच्या मनातल्या इच्छा पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांची ही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला कशी उपयोगी पडेल असा त्यांचा हेतूही त्यातूनस्पष्ट होतो.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More