वृत्तविहार : निवडणुकीनंतरची ‘दरवाढ’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : निवडणुकीनंतरची ‘दरवाढ’

निवडणुका संपायला आल्या म्हणजेच मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याच्या परिस्थितीत असताना आता अनेक गोष्टींची भाववाढ सुरु होईल. निवडणुकीचा प्रचार चालू असेपर्यंत कोणत्याही वस्तूंच्या दरामध्ये वाढ होणार नाही याची काळजी राजकारण्यांनी किंवासत्ताधाऱ्यांनी घेतली असावी. पण आता राजकारण्यांना दुष्काळाची आठवण होऊ लागली आहे तर व्यापारीसुध्दा वेगवेगळ्या पध्दतीने भाववाढीची तयारी करू लागलेले दिसतात. दुष्काळाचे कारण पुढे करीत राज्यातील कडधान्यांचे भाव वाढायला सुरुवात झाली. तीन वर्षापूर्वी ज्या तूरडाळीने दोनशे रुपये किलोचा विक्रम गाठला होता. ती नंतरच्या काळात साठ ते सत्तर रुपयापर्यंत खाली आली. परंतु आता तूरडाळीबरोबरच इतर डाळींचे भावदेखील वाढायला सुरुवात होईल. दुष्काळामुळे भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले असतानाच कडधान्य किंवा डाळी महागल्या तर सामान्य माणसाचे महिन्याचे गणित बिघडते. तर रोजंदारीवर काम करणारा माणूस पैसे वाचवण्याची वेगवेगळी कसरत करू लागतो.

अगदी ताज्या परिस्थितीनुसार दुष्काळामुळे या डाळींची बाजारातली आवक तब्बल दोनशे ते तीनशे टनांनी घटली आहे. फेब्रुवारी महिन्यात आठशे ते एक हजार टन डाळी आणि कडधान्यांची आयात होत होती. ती आता सातशे ते आठशे टनांपर्यंत खाली आली आहे. पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये ही आवक खाली येण्याची शक्यता आहे.  त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर होईल आणि या टंचाईचा गैरफायदा घेत व्यापारी आणखीनच भाव वाढवतील कारण सध्या साठ ते पासष्ट रुपये किलो असलेली ही डाळ शंभर रुपयापर्यंत नेली जाईल. या कृत्रिम भाववाढीचा सर्वसामान्य माणसाला जबरदस्त फटका बसतो त्याचवेळी व्यापारी मात्र चांगलाच नफा कमावून घेतात. निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील अन्नधान्याची परिस्थिती काय आहे याचा विचार करायला राज्यकर्त्यांना वेळ मिळाला नाही.

साधारणपणे वेळापत्रकाप्रमाणे डाळी किंवा कडधान्यांचे साठे पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहातील असा प्रयत्न होत असतो. परंतु सामान्य माणसाच्या या दैनंदिन गरजांपेक्षा राजकारण्यांना निवडणुकीचा हंगाम महत्वाचा वाटत असतो आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते नेहमीप्रमाणे या सामान्य माणसांना सहन करावे लागतात. यावेळी तर दुष्काळाचा प्रभाव नेहमीपेक्षा जास्त आहे. पाऊस वेळापत्रकाप्रमाणे जर आला नाही, केवळ डाळी किंवा कडधान्यांच्या बरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंच्याही किंमती भडकण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती यापूर्वीच वाढायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच पुढच्या महिन्याभरात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू शकतात. आणि काही वस्तूंच्या किंमतीमध्येसुध्दा भर पडू शकते.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More