वृत्तविहार : निवडणुकीतील धनशाही – eNavakal
लेख

वृत्तविहार : निवडणुकीतील धनशाही

निवडणुकीच्या काळामध्येच अनेक ठिकाणी रोकड सापडण्याचे वाढते प्रकार पाहिल्यानंतर लोकशाहीच्या नावाखाली धुमाकुळ घालत असलेल्या धनशाहीचा प्रत्यय येतो. कारण तामिळनाडूमधील वेल्लोर येथील लोकसभा निवडणुक ही या रोख रकमेच्या कारणावरून रद्द करण्याचा प्रकार घडून आलेला आहे. तेथील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या उमेदवाराकडे थोडीथोडकी नव्हे तर तब्बल बारा कोटी रुपये रोख रक्कम स्वरुपात सापडले. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे आयकर विभाग आणि निवडणुक आयोग या दोघांनी मिळून सदर उमेदवाराच्या घरी धाडसत्र अवलंबले त्यामधून हे घबाड समोर आले. अशा प्रकारचा पैशांचा साठा या उमेदवाराकडे असल्याची माहिती 29 मार्च रोजीच संबंधित यंत्रणांना मिळाली होती. तो पैसा निवडणुकीमध्येच वापरला जाणार असल्याची शक्यता असल्याने त्याच्यावर या विभागांमार्फत नजर ठेवली गेली आणि अखेर या नेत्याच्याच एक सिमेंट गोदामामध्ये ही रक्कम ठेवल्याचे समोर आले. निवडणुकांमध्ये पैसे वाटून मत विकत घेणे हा प्रकार अगदी सर्रासपणे केला जातो. त्या त्या शहरांचे किंवा गावांचे एक विशिष्ट परिसर किंवा टापू नक्की करून तिथे पैशाचे वाटप केले जाते. एकूण मतदानापैकी किमान तीस टक्के मतदान हे पैसे वाटून घडवून आणले जात असल्याचाही आरोप केला जातो. एखादा उमेदवार आपल्या निवडणुकीसाठी दहा दहा कोटीची रोकड सोबत बाळगत असेल तर तो प्रत्यक्ष किती भ्रष्टाचार करीत असेल हे स्पष्ट होते. यावरून लोकशाहीचे याच राजकीय नेत्यांकडून कसे धिंडवडे काढले जातात यावरही प्रकाश पडतो. सगळे गैरप्रकार रोखायचे असतील तर निवडणुकांमधली पैशाची दांडगाई कमी केली पाहिजे. बारा कोटीचा हा आकडा धक्कादायक आहे यावरून देशातील इतर उमेदवार किती पैसा खर्च करीत असतील याचाही अंदाज येतो. निवडून येण्याकरीता साधारणपणे एका लोकसभा मतदार संघात प्रमुख पक्षाचे उमेदवार सरासरी तीन ते चार कोटी रुपये खर्च करतात. काही ठिकाणी हे प्रमाण सहा कोटीपर्यंत जाते. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणायला हवी. कारण हा सगळा पैसा रोख स्वरुपात असतो आणि तो गैरमार्गाने गोळा केल्याने त्यातून भ्रष्टाचाराला अगदी उघडपणाने प्रोत्साहन मिळत असते. ज्या देशातील चाळीस टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली राहते त्या देशातील निवडणुकीत चाळीस टक्के पैसा भ्रष्टाचाराने गोळा केला जात असेल किंवा वाटला जात असेल तर देशातील गरीबीचे कारण काय आहे, हेदेखील त्यातून समोर येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More