वृत्तविहार : नक्षलवाद आणि दहशतवादाचा धग – eNavakal
लेख

वृत्तविहार : नक्षलवाद आणि दहशतवादाचा धग

नक्षलवादी आणि दहशतवादी यांचे धोके अजूनही कायम आहेत. सरकारचे प्रयत्न सुरू असूनही पोलिसांचे किंवा जवानांचे हौतात्म्य वाया जाता कामा नये. छत्तीसगढमध्ये अलिकडेच पंधरा माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले ही मोहीम जर अशीच चालू राहिली तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये असलेला नक्षलवाद्यांचा धुमाकुळ मोडून काढता येणे शक्य होणार आहे. दोन्ही सरकारांनी नक्षलग्रस्त भागामध्ये स्वतंत्र पोलीस कुमकच तैनात केल्यामुळे आणि सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने नक्षलवाद्यांचा बिमोड होणे आता फारसे कठीण राहिलेले नाही. परंतु काश्मिरमधला दहशतवाद अजूनही नियंत्रणात आलेला नाही.

जम्मू काश्मिरमधले सरकार बरखास्त करून तिथे राज्यपालांची राजवट लागू केली गेली आहे. मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार दहशतवादाविरुध्द कठोर भूमिका घेऊ शकत नाही. या कारणामुळे भारतीय जनता पार्टीने या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. परंतु राज्यपाल राजवट येऊनही जर दहशतवाद्यांचे हल्ले होणार असतील तर मात्र सरकार बरखास्त करण्याचा निर्णय फारसा योग्य नसल्याचेच म्हणावे लागेल.

अलिकडेच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहिद झाले त्यातला एक जवान मुंबईच्या मिरारोड भागातला आहे. मेजर म्हणून सैन्यदलात काम करणाऱ्या ३८ वर्षीय कौस्तुभ राणे याने देशासाठी केलेले हे बलिदान एक मोठा त्याग ठरते यात काही शंका नाही. परंतु दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यामध्ये जवानांचे हे बळी जाणे देशाला परवडणारे नाही. उलट अशा कर्तृत्वान जवानांचे शौर्य देशातील इतर तरूणांनाही प्रेरणा देणारे ठरले पाहिजे. सरकारने किंवा सैन्य दलाने आपले कमीत कमी नुकसान होईल अशा प्रकारची व्यूहरचना करणे गरजेचे ठरते. आपले चार जवान बळी जात असतील तर पन्नास दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्याचे कठोरपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More