वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती – eNavakal
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु वाहतूक कोंडी होऊ शकते आणि तिच्यावर उपाय करता आले पाहिजेत. याकडे मात्र सोयिस्करपणे दुर्लक्ष होत राहते. एवढा मोठा मुंबई पुणे द्रूतगती मार्ग बांधला गेला ज्यामुळे मुंबई-पुणे हे अंतर निम्म्याने कमी झाले पण अपघात, वाहतूक कोंडी किंवा भरमसाठ टोल यासारखे प्रश्न आजही कामय आहेत.

दोन दिवसापूर्वीच याच द्रूतगती मार्गावर खंडाळ्याच्या अमृतांजन पुलावर लोखंडी सळया भरलेला ट्रोलर उलटला आणि या मार्गावरची वाहतूक थोडेथोडके नव्हे तर तब्बल सहा तास ठप्प झाली. डोकेदुखीवर वापरले जाणारे अमृतांजन त्या पुलाजवळच्या अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी लोकांसाठी नवी डोकेदुखी निर्माण करणारी ठरली. म्हणजे प्रत्येक वाहनामागे अडीचशे ते पाचशे रुपयांचा टोल वसूल करायचा पण अशा वाहतूक कोंडीच्यावेळी कोणतीही तातडीने हालचाल करायची नाही किंवा तशा सुसज्ज यंत्रणा वापरायच्या नाहीत आणि लोकांचे हाल मात्र होऊ द्यायचे. अशी सगळी सरकारची काम करण्याची पध्दत आहे. टोल वसूल करणारी कंपनी रोज अक्षरशः कोट्यवधी रुपये गोळा करते. तिने अशा ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर त्या कंपनीकडून उपाययोजना होत नसेल तर त्या कंपनीला एवढा टोल कशासाठी द्यायचा असा प्रश्न निर्माण होतो. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर अशी वाहतूक कोंडी पहिल्यांदाच निर्माण झाली असे नाही. वारंवार त्या ठिकाणी काही समस्या उभ्या राहतात. महिन्यातून दोन तीन वेळा हा सगळा प्रकार लोकांना अनुभवावा लागतो. ज्याला आपण द्रूतगती म्हणतो. त्याच महामार्गावर मुंबईपासून पुण्यापर्यंत येणारे तीन टोलनाके, अनेक ठिकाणचे खड्डे, मधून मधून दरडी कोसळण्याचे प्रकार, आठवड्यातून होणारे सरासरी एक दोन अपघात अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हा द्रूतगती मार्ग कासवगती होऊन जातो आणि मग चार चार, पाच पाच तास गाड्या जागच्या हलत नाहीत. प्रवासामध्ये सर्वात जास्त त्रासदायक प्रकार हा वाहतूक कोंडीचा असतो. कोणी काही करू शकत नाही पण तासनतास अडकून मात्र पडावे लागते. अशा द्रूतगती म्हणवणाऱ्या मार्गांवर अचानकपणे उद्भवणाऱ्या समस्या तितक्याच द्रूतगतीने सोडवायला हव्यात. परंतु तेवढे सोडून सगळे काही द्रूतगतीने होते म्हणजे टोलनाक्यावरचे पैसे प्रचंड गतीने वसूल केले जातात. अशी सगळी व्यवस्था आहे. मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा एक द्रूतगती महामार्गसुध्दा इतक्या कार्यक्षमपणे हाताळला जात नाही किंवा त्याची देखभाल केली जात नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More