वृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : दुष्काळ घोषणेसाठीही मुहूर्त

एखादे संकट घोंघावत असताना त्याचे परिणाम काय असतील. हे तपासण्याकरीता किंवा त्या संकटाशी सामना करणाऱ्या उपाययोजनांकरीता मुहूर्ताची वाट बघणे आश्चर्यकारकच ठरते. यंदा महाराष्ट्राचा निम्म्यापेक्षा जास्त भाग दुष्काळग्रस्त आहे. परंतु शासकीय स्तरावर त्याची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कोणत्या भागात किती प्रमाणात पाणी टंचाई आहे. हे पाहण्याची किंवा त्याचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ते पालक मंत्री आपला अहवाल देतील त्या अहवालाचा अभ्यास होईल व सरकारी निकष लावले जातील आणि मग दुष्काळाची अधिकृत घोषणा होईल. तोपर्यंत ज्यांना या पाणीटंचाई आणि दुष्काळाचे चटके बसत आहेत त्यांनी ते निमूटपणे सहन करायचे. वेधशाळांकडून अजूनही पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा झाली नाही म्हणजे पावसाळा संपायच्या आतच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरे तर गेल्या महिनाभरापासूनच राज्याच्या अनेक भागात पावसाने निरोप घेतला आणि केवळ शेवटच्या दोन तीन पावसाअभावी चांगले घसघशीत येणारे पीकही हाताशी आलेले नाही. आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. याची ताजी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे असणे अपेक्षित मानले जाते. पाणीटंचाईसारख्या किंवा दुष्काळासारख्या अत्यंत गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत. शासनाच्या म्हणजेच मंत्रालयात सतत स्थानापन्न असलेल्या बड्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या समोर ही सर्व वस्तूस्थिती मांडली पाहिजे. आता पुन्हा पालकमंत्र्यांकडून माहिती गोळा करण्याचे काहीच कारण उरत नाही. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही तासात त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळवता येऊ शकते आणि पुढच्या जास्तीत जास्त दोन चार दिवसात दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीची यंत्रणा कार्यरत करता आली पाहिजे. इतक्या वेगाने काम करता येणे म्हणजेच गतीमान शासन असणे हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु पालकमंत्र्यावर जबाबदारी सोपवणे किंवा त्यांच्या अहवालाची वाट पाहणे हा चालढकल करण्याचा प्रकार ठरतो. पालक मंत्री हे काही दुष्काळ परिस्थितीचे तज्ञ किंवा अभ्यासक नाहीत.

एकूणच दुष्काळाचे चित्र भीषण स्वरुपाचे असताना सरकारी पातळीवर होणारी ही राजकीय दीरंगाई धक्कादायक ठरते. कोणताही वेळ वाया न घालवता परिस्थितीचे तातडीने आकलन करण्याची आणि उपाययोजना अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्ताची वाट पाहणे समजून घेता येईल परंतु दुष्काळासारख्या संकटाचा सामना करण्याकरीता ऑक्टोबर महिन्याची अखेर निवडण्याची काहीच गरज उरत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More