वृत्तविहार : दिल्ली दंगलीचा खटला चालूच – eNavakal
लेख

वृत्तविहार : दिल्ली दंगलीचा खटला चालूच

दिल्लीत 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीत ज्यांचा मोठा हात होता. त्या काँग्रेस पक्षाच्या सज्जन कुमार यांना हायकोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. परंतु या निकालाविरुध्द ते पुन्हा उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार आहेतच. म्हणजे कायद्याचा हा लढा असाच पुढे चालू राहील. ही दंगल झाली त्यावेळी सज्जनकुमार 42 वर्षाचे होते. संजय गांधी , कमलनाथ, जगदिश टायटलर अशी सगळी ही चौकडी होती.आज हे सज्जनकुमार 72 वर्षांचे आहेत. इंदिरा गांधींचे अतिशय जवळचे नेते म्हणून त्यांचा प्रचंड दबदबा होता. किंबहुना या चौघा पाच जणांच्या सल्ल्यानुसारच सरकारचे निर्णय होत असत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर या सगळ्यांच्याच शेपटावर पाय पडला आणि त्यांनी दिल्लीमध्ये अक्षरशः नरसंहार घडवला आज चाळीस वर्षानंतर कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे. यावरून आपल्या देशाची एकूण न्यायव्यवस्था काय स्वरुपाची आहे याची कल्पना तर येतेच. पण गुन्हा करणाऱ्य़ांनाही कशा प्रकारचे जीवदान मिळू शकते हेही त्यातून स्पष्ट होते.

दिल्लीतल्या शीख समुदाय 84 ची दंगल कधीही विसरू शकत नाही. कारण ज्या कृतघ्नपणे अनेकांना जाळले गेले. ती आठवण त्या लोकांच्या मनात अजूनही कायम आहे. दंगल कोणतीही असो त्यात गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. गुजरातमधल्या दंगलीबाबतही सगळेच निकाल लागलेले नाहीत. तेसुध्दा वेगाने पूर्ण झाले पाहिजेत. कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवणाऱ्यांना रोखायचे असेल किंबहुना त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबवायचे असेल तर याबाबतचे खटले वेगाने निकाली काढले पाहिजेत. एवढा मोठा नरसंहार होतो आणि त्याबाबतची सुनावणी अतिशय मंदपणे चालते. चाळीस चाळीस वर्षे होऊनही त्याबाबतचे अंतीम निकाल लागत नाहीत. हा एकाअर्थी जागतिक विक्रमच म्हणावा लागतो. आपण ज्या लोकशाही व्यवस्थेचे कायम कौतुक करतो. त्या लोकशाही व्यवस्थेतली ही न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि भक्कम करणे काळाची गरज ठरते. याबाबत कोण किती आग्रही आहे यावर या व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे. दिल्ली दंगलीमधले नावाने सज्जन कुमार असलेल्या अशा दूर्जनांना शिक्षा होणे हा सामाजिक व्यवस्था पारदर्शक करण्याचा एक भाग ठरतो. सरकारने केवळ कायदा सुव्यवस्थेचा डांगोरा पिटू नये. गुन्हेगारांना वेगाने शिक्षा होतील अशा प्रकारचे जर निकाल लावणे जाणे हा देखील  कायदा सुव्यवस्थेचाच एक भाग ठरतो. गेल्या काही वर्षामध्ये न्यायालयामध्ये तुंबून असलेल्या खटल्यांची आकडेवारी वारंवार प्रसिध्द होत आहे. विशेष म्हणजे देशभरात तब्बल तीन कोटी खटले वेगवेगळ्या न्यायालयामध्ये रखडलेले आहेत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More