वृत्तविहार : त्या कामगारांना सलाम – eNavakal
लेख

वृत्तविहार : त्या कामगारांना सलाम

मुंबईच्या धो धो पावसाने सरकारी यंत्रणांच्या कामाचीही एकाअर्थी धुळधाण उडवली. परंतु एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे. की या पावसामध्ये महापालिकेतर्फे बर्‍यापैकी दिलासा दिला गेला. पाणी तुंबण्याची ठिकाणे निश्चित करून तिथे कर्मचार्‍यांच्या ड्यूट्या लावल्या गेल्या होत्या. चार ठिकाणी पाणी उपसा करणारे पंपिंग चालू होते. गटारांमध्ये अडकणारे पदार्थ लगोलग बाहेर काढून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे चालू होता. तरीदेखील काहीठिकाणी पाणी तुंबण्याचा प्रकार घडला. आणि ही सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरीता पालिकेचे चारशे कर्मचारी भर पावसामध्ये तैनात केले गेले होते. ही परिस्थिती लक्षात न घेता महापालिकेवर होणारी टीका कशी चुकीची आहे हे दाखवून देण्याचे काम पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले. विशेषतः त्यांनी दिवसरात्र खपणार्‍या या कर्मचार्‍यांची जी बाजू घेतली ती आम्हाला विशेष महत्वाची वाटते. हे कर्मचारी साध्या वेशांमध्ये आपले काम करीत होते. परंतु त्यांचे काम हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. पाणी तुंबण्याची अनेक कारणे आहेत. ती शोधून काढावी लागतील. परंतु केवळ नालेसफाई किंवा गटारांची सफाई एवढ्यावरच थांबून राहाता येणार नाही. अधिक सखोलपणाने या समस्येचा विचार करण्याची वेळ आली आहे. याची प्रामाणिक कबुलीदेखील आयुक्तांनी दिली. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित मलनिस्सारण किंवा पर्जन्य जलवाहिन्या हे प्रमाण दिवसेंदिवस असमान होत आहे. सेवा सुविधांवर पडणारा हा ताण दूर करण्याकरीता बर्‍याच सुधारणा कराव्या लागतील. आता असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांपेक्षा मोठ्या किंवा अधिक अथवा पर्यायी पर्जन्य जलवाहिन्यांची व्यवस्था हादेखील त्या उपायांमधला भाग असू शकतो. धो धो पाऊसकोसळत असताना आणि अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडत असताना केलेल्या उपाययोजनाही अपुर्‍या पडल्या म्हणून महापालिकेने कोणतीच काळजी घेतलेली नाही. असा सरसकट आरोप करता येणार नाही. पालिकेच्या स्थायीसमितीत चारशे पालिका कर्मचारी कसे रात्रंदिवस खपत होते हे सांगून समितीच्या सदस्यांना स्पष्ट उत्तर देण्याचे धाडस आयुक्तांनी दाखवले. शेवटी समितीसदस्य पालिकेलाच सहकार्य करीत नाहीत असे बघून आयुक्तांना समितीच्या बैठकीतून निघून जावे लागले. परंतु अशा परिस्थितीत पालिकेने उचललेली ही जबाबदारी अगदीच टाकावू स्वरुपाची होती असे म्हणणे पालिकेवर म्हणजेच त्या राबणार्‍या कामगारांवर अन्याय करणारे ठरते. या महानगराचा पसारा इतक्या विचित्र पध्दतीने वाढतो आहे की त्याच्याशी सामना करणे ही साधी सोपी गोष्ट राहिलेली नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More