वृत्तविहार : डेंग्यू आणि सरकारी दीरंगाई – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार : डेंग्यू आणि सरकारी दीरंगाई

गेल्या काही दिवसांंपासून राज्यभर डेंग्यूने धुमाकुळ घातलेला दिसून येतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद एवढेच नव्हे तर नागपूरमध्येसुध्दा डेंग्यूचे थैमान दिसून येते. गेल्या सहा महिन्यांंत संपूर्ण राज्यात डेंग्यूच्या सहा हजार केसेस नोंदल्या गेल्या. तर एकट्या मुंबईत पाच जणांना या डेंग्यूमुळे आपले प्राण गमवावे लागले राज्यभरात डेंग्यूचे एकूण तेवीस बळी असल्याचे सांगितले जाते. त्याच्या जोडीला मलेरिया, गॅस्ट्रो, हिपेटायटीस या आजारांनीही पावसाळ्यामध्ये अनेकांना पछाडल्याचे समोर आले आहे. त्यात या महिन्यातच मलेरियाचे 625 रुग्ण असल्याचे आढळून आले.

लेप्टोसारख्या रोगाने बारा जणांचे बळी घेतल्याचे महापालिकेच्याच आकड्यावरून समोर आले आहे. याचा अर्थ अनेक प्रकारची उपाययोजना करूनही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोसारखे आजार नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. डेंग्यू या रोगाचा विचित्र प्रकार असा आहे की, एकीकडे तापाचे प्रमाण वाढत असतानाच रक्तपेशी कमी होतात आणि एकाचवेळी ताप नियंत्रणात आणून रक्तपेशींची संख्या पूर्ववत करण्याचे अतिशय अवघड काम डॉक्टरांना करावे लागते. ज्या विशिष्ट डासांमुळे डेंग्यू आजार होतो त्याचे पूर्ण निर्मूलन करण्यामध्ये सरकारी यंत्रणा यशस्वी ठरलेल्या नाहीत. मुंबईसारख्या महानगरात पाणीसाठण्याचे प्रकार घडतात. अनेकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे चालू आहेत. महिनोनमहिने तिथे साचणारे घाण पाणी या डासांची निर्मिती करतात आणि त्याचा फटका जनतेला बसत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन निदान पावसाळ्याच्या काळात सदर डासांच्या निर्मूलनाची तितकीच मोठी मोहीम महापालिका ,नगरपरिषदा किंवा राज्याच्या आरोग्य खात्याने राबवल्या पाहिजेत. परंतु इतकी संवेदनशीलता किंवा कार्यक्षमता आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये नाही. खरे तर डेंग्यू किंवा मलेरियाचे डास हे ज्या अस्वच्छतेमुळे किंवा साचलेल्या पाण्यामुळे होतात असे जे सांगितले जाते त्याच्याबरोबरीने अकार्यक्षमता आणि बेफिकीरीच्या सरकारी सांडपाण्याचा हा सर्वात मोठा प्रादूर्भाव आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही केवळ जाहीराती देऊन लोकांनी काय काळजी घ्यावी याचा उपदेश केला जातो. परंतु डास निर्मूलन करणारे फवारणी आठवड्यातून किमान दोनवेळा करण्याची तत्परता सरकारी यंत्रणांकडून दाखवली जात नाही.

सरकारी दीरंगाई हे डेंग्यू प्रसाराचे महत्वाचे कारण गृहित धरले पाहिजे. यासंदर्भात लोकांकडूनच वारंवार तक्रारी होतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पैसा खर्च केला जाऊ नये म्हणून खर्चिक वैद्यकीय उपचार करून घेतले जातात. सहा हजार रुग्णांची संख्या हा धोकादायक आकडा समजला पाहिजे. आणि भविष्यकाळात डेंग्यूच्या धोक्याचीही ती चाहूल मानली पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More