वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा   – eNavakal
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे कमकुवत आहे. हे सांगण्यातच फुशारकी मारत राहातील. परंतु पुन्हा पुन्हा हे सांगितले पाहिजे की विजयाचे श्रेय घेणारे अनेक लोक असतात तसाप्रकार भाजपामध्ये राहील. मुळात हा विजय तसे पाहिले तर लौकिकार्थाने एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा असला तरीदेखील हा जनभावनेचाही विजय मानला पाहिजे आणि ही जनभावना एका राजकीय पक्षाच्या बाजूने आहे असा निष्कर्ष न काढता ती देशाच्या सुरक्षिततेच्या बाजूने आहे. हा त्यातला मतितार्थ समजून घेतला तर निवडणुकीचे राजकीय विश्लेषण हा प्रासंगिक मुद्दा ठरतो. तर लोकशाहीचा सिध्दांत म्हणून विचार केला तर तो जनभावनेचा विजय ठरतो. दुर्दैवाने आपल्या देशात इतके निपक्षपातीपणे विश्लेषण होत नाही. अक्षरशः 67 कोटी लोक या निवडणुक प्रक्रियेत जेव्हा सहभागी होतात तेव्हा त्यांच्या भावना आणि अपेक्षा त्यांच्याशी जोडलेल्या असतात. हे लक्षात न घेता केवळ राजकीय पक्षांचे महत्व वारंवार लोकांच्या मनावर बिंबवले जाते.

अगदी निवडणुकीची घोषणा होते तेव्हापासून ते निकाल लागेपर्यंत राजकीय पक्षच आपला प्रभाव ठेवतात. प्रसार माध्यमांकडूनही त्याचीच वारंवार चर्चा होत राहाते. परंतु जी जनता खऱ्या अर्थाने लोकशाहीचे भवितव्य ठरवते त्या जनभावनेचा हा सन्मान आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यावर्षी प्रथमच प्रचंड प्रमाणावर सोशल मिडीयाचा आणि सर्वप्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला लोकांच्या मनावर आपले महत्व बिंबवण्याकरीता केले गेले. दुर्दैवाने राजकारणाचा हा प्रभाव पक्षाला न्याय देणारा नाही असेच म्हणावे लागते. ही सगळी परिस्थिती अभ्यासली पाहिजे. आणि निकालांचे सामाजिक संदर्भ लोकांपुढे मांडले पाहिजेत. शेवटी विजयाचे श्रेय राजकीय पक्ष घेतात. हीच लोकशाहीची शोकांतिका म्हटली पाहिजे. राजकीय पक्ष निवडून आल्यानंतर एकमेकांचे अभिनंदन करीत असतात. एकमेकांच्या तोंडात पेढे भरवत असतात परंतु जी सामान्य जनता खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका बजावते. तिला केवळ धन्यवाद देऊन बोळवले जाते. तिचे अभिनंदन मात्र केले जात नाही. किंवा तो सगळा विजय जनतेला समर्पित करण्याचा प्रामाणिकपणाही दाखवला जात नाही. जोपर्यंत अशा प्रकारचा विनम्रपणा राजकारण्यांमध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानेलोकशाहीचा सन्मान झाला असेही म्हणता येणार नाही.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More