वृत्तविहार : चंद्रकांत पाटलांची घुसमट – eNavakal
लेख

वृत्तविहार : चंद्रकांत पाटलांची घुसमट

आपण कोणतीच निवडणूक लढवणार नाही. असे अगदी स्पष्टपणे सांगितल्यानंतर चोवीस तासात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोलांटउडी मारली आणि आपण कोल्हापूरमध्ये गणेशोत्सव काळात वापरल्या जाणाऱ्या डाॅल्बीच्यासंदर्भात बोलत असताना या विषयाचा उल्लेख केला होता. परंतु त्या भाषणाची चित्रफित जर चंद्रकांत पाटील यांना पुन्हा ऐकवली तर त्यांना आपण काय बोललो होतो हे अगदी चष्मा न वापरता स्पष्टपणे दिसू शकेल. खरे तर ते जे काही बोलले ते मनापासून बोलले होते आणि हीदेखील वस्तुस्थिती आहे की चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्याची राजकारणाच्या मूल्यहीन भणंग बाजारामध्ये किती घुसमट होत असावी हे सहज लक्षात येते. अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्षामध्ये प्रामाणिक कार्यकर्ते दिसत नाहीत अशी प्रामाणिक भावना सहजपणाने बोलून दाखवली होती.

भारतीय जनता पार्टीतली ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. कारण पक्षापेक्षाही बाहेरून आयात केलेल्यांची आज या पक्षामध्ये भाऊगर्दी झाली आहे. की ज्यांनी पक्षासाठी मर मर काम केले आहे त्यांना खिजगणतीतही घेतले जात नाही. अशा आयात केलेल्या कार्यकर्त्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्तेदेखील दिसेनासे होतात. एकेकाळी चळवळीत राहून खऱ्या अर्थाने जनभावनेचा आवाज ओळखण्याची सवय असणाऱ्या चंद्रकांत पाटील यासारख्या कार्यकर्त्याला राजकारणातल्या लबाड्या किंवा कुलंगड्या किती टोकाच्या असू शकतात. याचे अगदी जवळून दर्शन झाले असावे आणि हे कितीकाळ सहन करायचे किंवा आपल्याला हे सहन करण्यापलिकडचे आहे. असे जेव्हा वाटले असेल तेव्हा कोणत्याच प्रकारची निवडणूक लढवू नये अशी एक उबगावस्था त्यांच्यात आली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आतादेखील त्यांनी खुलासा करण्याची कसरत केलेली पाहिल्याबरोबर तीदेखील वरिष्ठांच्या दबावाखाली केली असल्याचे स्पष्टपणे दिसते.

फडणवीसांपेक्षाही अधिक कष्ट करणारा किंवा अधिक पारदर्शक व्यवहार ठेवणारा आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा अजूनतरी कायम ठेवलेली दिसते. किंवा त्यांची ही घुसमट पक्षाच्या लक्षात येणार नाहीच उलट ती अडचण वाटू शकते. म्हणूनच लोकांनीच ती समजून घेतली पाहिजे. निवडणूकीशिवाय राजकारण करता येत नाही. हा समज खोटा ठरवता येऊ शकतो. यासाठी अनेक मोठ्या समाजसेवकांची उदाहरणेही डोळ्यासमोर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आता जरी कोलांटउडी मारली असली तरी आपल्या त्या प्रामाणिक भावनेची प्रतारणा करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More