वृत्तविहार : ग्राहक आणि आजचे डिजिटल युग – eNavakal
लेख

वृत्तविहार : ग्राहक आणि आजचे डिजिटल युग

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा झाला. परंतु ग्राहकांचे हित जपण्याकरीता अधिक प्रभावी उपायांची गरज आहे असे अजूनही सरकारला वाटत नाही. आजच्या डीजीटल किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकूणच बाजारपेठेचा नूर बदललेला आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारांचे स्वरुप पूर्वीसारखे राहिलेले नाही.काही प्रमाणात ग्राहक हित जपणारे कायदे झाल्याने मालाची विक्री करताना उत्पादकांना काही नियम पाळावे लागतात. परंतु ऑनलाईन खरेदी विक्री किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार होतात. आणि ऑनलाईन मागवलेल्या मालाच्या दर्जाबद्दल अनेकवेळेला फसवणुकीच्या तक्रारी ऐकू येतात. चुकीचा माल पाठवण्यापासून ते निकृष्ट वस्तूंची विक्री करण्यापर्यंतचे प्रकार या ऑनलाईन व्यवहारात पाहायला मिळतात. या खरेदी विक्रीमध्ये ज्या कंपनीचा माल असतो त्याची पुरेशी माहिती त्या प्रॉडक्टवर नसते. फक्त ज्या कंपनीकडून माल मागवला जातो त्या ऑनलाईन कंपनीची पावती फक्त उपलब्ध होते. पण त्या पावतीच्या आधारावर संबंधित उत्पादनाविरुध्द तक्रारसिध्द करता येत नाही ही आजची परिस्थिती आहे. या काही अडचणी सामान्य माणसासाठी दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागल्या आहेत. विशेषतः आजची तरूण पिढी ईलेक्ट्रॉनिक गॅझेटचे बरेच प्रकार ऑनलाईन मागत असते. महागड्या मोबाईलची किंवा लॅपटॉपचीसुध्दा खरेदी या पध्दतीने होते. प्रत्यक्षात त्यापैकी एकाही वस्तूची किंवा मालाची हमी घेतली जात नाही किंवा दिली जात नाही. आणि या ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंबाबत वर्षभरातच तक्रारी सुरु होतात. ग्राहक न्यायालयांकडे याबाबत तक्रारी करूनही फारसा उपयोग होत नाही. आज तर डीजीटल व्यवहारांमुळे कागदोपत्री व परस्पर फसवण्याचे प्रकार वाढले आहेत ज्याचे आपण सायबर क्राईम म्हणून वर्णन करतो. एक ग्राहक म्हणून या सर्व प्रकरणात नेमकी तक्रार कुठे करायची किंवा दाद कशी मागायची असा प्रश्न निर्माण होतो. एवढेच नव्हे तरसरकार ग्राहक संरक्षणाच्या दवंड्या पिटत असते. परंतु ग्राहकाला संरक्षण देणारे कायदे अजूनही तितकेसे सक्षम नाहीत. कारण या ग्राहक न्यायालयांमधून मिळणारा न्याय इतक्या उशिराने लागतो की ते उत्पादन, ती कंपनी याचा त्या त्या काळाशी असलेला संदर्भही संपुष्टात येण्याची भीती असते. विशेष म्हणजे ग्राहक न्यायालयांचीसुध्दा परिस्थिती इतकी विचित्र आहे की त्यांच्याकडे चांगल्या इमारती नाहीत. पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. स्वाभाविकपणे त्याचा ग्राहक न्यायालयाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला बऱ्याच उशिरा न्याय मिळतो. म्हणूनच आता बदललेल्या काळानुसार ग्राहक न्यायालयांचे कारभार डीजीटल किंवा अधिक वेगवान आणि सक्षम होण्याची गरज आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More