वृत्तविहार : गुन्हेगारांच्या जामीनाचा गुन्हा – eNavakal
लेख

वृत्तविहार : गुन्हेगारांच्या जामीनाचा गुन्हा

राज्यातील कारागृहांबाबत नेहमीच काही ना काही तक्रारी पुढे येत असतात. विशेषत: कैद्यांना तिथे दिली जाणारी वागणूक, कैद्यांची प्रचंड होणारी गर्दी यातून कैद्यांमध्येच होणारी हाणामारी कधी कधी तर इतक्या पोलिसांनाही कैद्यांच्या मारहाणीचा प्रसाद खावा लागतो परंतु काही दिवसापूर्वीच भायखळा जेलमध्ये कैद्यांना झालेल्या विषबाधेचा प्रकारही ताजाच आहे.

नाशिक कारागृहात काही गुंड कैद्यांची बडदास्त ठेवली जाण्याचा एक व्हिडीओसुध्दा काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता आतातर एक नवीनच प्रकार उघडकीस आला असून कैद्यांना जामीन मिळवून देणारे आणि बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून पैसे उकळणारी गॅंग पोलिसांच्या हाती लागली आहे आतापर्यंत जवळपास दीडशे कैद्यांना जामीन मिऴवून देण्याचा उद्योग या गॅंगने केला प्रत्येक कैद्याकडून 15 ते 20 हजाराची रक्कम वसुल केली जाते. परंतु जामीन मिळणार असल्याने कैद्यांचे नातेवाईकही ती रक्कम द्यायला तयार होतात. म्हणजे कारागृहातल्या कैद्यांची गाठभेट घेणे आणि त्यांच्या जामीनाची सर्व प्रकारे व्यवस्था करणे अशी सगळी जबाबदारी ही गॅंग घेत असते. हा प्रकार ठाणे पोलिसांच्या लक्षात आल्याने या गॅंगचा पर्दाफाश होऊ शकला. मात्र या प्रकारामुळे एक गोष्ट समोर आली की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काय काय प्रकार घडू शकतात आणि बोगस पध्दतीने जामीन मिळवून देण्याचाही गुन्हा केला जाऊ शकतो असा हा काहीसा आश्चर्यकारक प्रकार ठरला आहे. यातल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारांना जामीन मिऴवून देण्याचा गुन्हा त्यांच्या चांगलाच अंगाशी आलेला दिसतो. पण या प्रकारात त्या गॅंगला सहकार्य करणारे कारागृहाशी संबंधित आणखी काही लोक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय तब्बल दीडशे लोकांना जामीन मिळवून देण्यात ही गॅंग यशस्वीही होऊ शकत नाही.

विधीमंडळ अधिवेशनात पॅरोलवर सुटलेले कैदी नंतर कसे फरार होतात याविषयीचे प्रश्न उपस्थित झाले होते आणि असे जवळपास शंभरापेक्षा जास्त पॅरोलवरचे कैदी पुन्हा कारागृहात परतलेच नसल्याची माहिती उघड झाली होती आता या सगळ्याच प्रकारांना कारागृहातूनच कुठेतरी फूस मिळत असली पाहिजे. यानिमित्ताने कारागृहांमधली ही हाराकिरी तितक्याच कठोरतेने तपासण्याची वेळ आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा

कोलकाता-आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू – कोलकाता लढतीत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या दमदार शतकामुळे प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 213...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More