वृत्तविहार : गडकरींच्या सुसाट वेगाच्या भन्नाट कल्पना – eNavakal
लेख

वृत्तविहार : गडकरींच्या सुसाट वेगाच्या भन्नाट कल्पना

जेव्हा कोणतेही वाहन रस्त्यावर सुसाट धावत असते त्यावेळी ड्रायव्हरशिवाय इतरांच्या डोक्यात सुसाट विचारही येत असतात. हा त्या गाडीच्या वेगाचा परिणाम असतो. ही जर रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची अवस्था असेल तर प्रत्यक्ष रस्ता वाहतुक मंत्री असलेल्या नितीन गडकरींच्या सुसाट विचारांचा वेग किती भन्नाट असू शकेल याची सहज कल्पना येऊ शकते. त्यांचे एकही भाषण, एकही मुलाखत एकही पत्रकार परिषद अशी नसते की ज्यात त्यांनी नवीन घोषणा केलेली नाही किंवा मोठमोठे आकडे सांगून काहीतरी अफाट सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु काहीवेळेला त्यांच्या या अफाट विचारांचा सुसाट वेग कुठेतरी अडखळतो आणि त्यांची पंचाईत करून टाकतो. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर इतक्या दिवसात ते कधी काही बोलले नव्हते आणि आता जे काही बोलले त्यांनी थेट नरेंद्रांपासून देवेंद्रांपर्यंत दोघांचीही एकाचवेळी अडचण केली. ते म्हणाले आरक्षण दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत. आणि मग राहुल गांधींपासून सगळेच विरोधी पक्ष हाच मुद्दा घेऊन सरकारवर टीका करीत आहेत.

नोकऱ्या नाहीत ही आज वस्तुस्थिती आहे. मनमोहन सिंगांच्या काळातही त्या नव्हत्या. परंतु निदान हे सरकार तरी नोकऱ्या देईल अशी अपेक्षा वाढल्याने आरक्षणाच्या मागणीचाही जोर वाढलेला दिसतो. एकीकडे नोकऱ्या नाहीत असे म्हणणारे गडकरी दुसरीकडे थेट कचऱ्यामधून अर्थक्रांती घडवण्याची भाषा करतात. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती होऊ शकते आणि तसा प्रस्ताव नीतीआयोगाने तयार करावा अशी सूचनाही करून टाकली. त्यांची ही सगळी भन्नाट कल्पनाशक्ती अशीच सुसाट वेगाने भरकटत असते. परंतु यातल्या योजना प्रत्यक्ष आल्याचे कोणाच्या अनुभवाला येत नाही. त्यामुऴे त्यांनी रस्ते बांधण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी रस्ते बांधणीचा हा वेगही त्यांनी असाच कायम ठेवावा. परंतु रोजगार किंवा अर्थक्रांतीसारख्या नुसत्याच सुसाट कल्पना मांडून स्वत: अडचण करून घेऊ नये. आज प्रत्यक्ष त्यांच्या मतदारसंघामध्ये एक लाख बेरोजगार तरूण आहेत. नागपूरातला कचरा प्रश्न फारसा सुटलेला नाही. अशा परिस्थितीत घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे अशी त्यांची एकूण परिस्थिती होऊ शकते. कल्पना मांडून समस्या सुटू शकत नसतात. त्याच्या अंमलबजावणीकरता तितकीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती लागते. बरे ती सुध्दा एकट्या गडकरींमध्ये असून भागत नाही ती सरकारमधून एकत्रितपणे समोर यावी लागते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More