वृत्तविहार : केबल ब्लॅकआऊटचे आंदोलन – eNavakal
लेख

वृत्तविहार : केबल ब्लॅकआऊटचे आंदोलन

देशातील दूरसंदेश आणि प्रक्षेपण क्षेत्राचे नियंत्रण करणाऱ्या ट्राय संस्थेने अलिकडेच केबल टीव्ही आणि डीटीएच सेवांचा नवीन दर नक्की केला आहे. जेवढ्या वाहिन्या वापरल्या जातील तेवढ्यापुरताच दर आकारला जावा, असे धोरण ट्रायने ठरवले. आणि त्याबाबतच्या सूचनाही सध्या चॅनल्सवरून दिल्या जात आहेत. परंतु या निर्णयाला केबल चालकांनी विरोध दर्शवल्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची शक्यता आहे.  आपल्या या विरोधाचे दर्शन घडवण्याकरीता केबल चालकांनी गुरुवारी संध्याकाळी सात ते दहा हे तीन तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वाभाविकपणे केबल चालकांचे या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. आता सरसकट तीनशे ते सहाशे रुपये केबल चालकांकडून आकारले जातात. तुम्ही कितीही चॅनल वापरत असलात किंवा पाहात असलात तरी सर्वांना सारखेच पैसे मोजावे लागण्याची ही पध्दतही चुकीचीच म्हणावी लागते. त्यामध्ये सुधारणा करून जितके चॅनल्स आवश्यक असतील तेवढ्यापुरतेच पैसे घेण्याची तरतूद अधिक वास्तववादी ठरते. परंतु हा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले गेलेले नाही किंवा आमचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. केबलचालकांनी आणि याच्याशी संबंधित यंत्रणाधारकांनी केली आहे.

सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी केलेले हे ब्लॅकआऊट आंदोलन किती प्रभावी आहे हे येत्या काळात समजेलच. परंतु यानिमित्ताने घरातल्या टीव्हीवर तीन चार तास कोणताही कार्यक्रम न दिसणे ही गोष्टदेखील डोक्याला शांतता देणारी वाटू लागते. आज चोवीस तास कार्यक्रम उपलब्ध असल्याने घरातील अनेक लोक टीव्ही अॅॅडीक्ट झाल्याचे पाहायला मिळते. आपले स्वतःचे खाजगी आयुष्य तर ते विसरतातच. परंतु टीव्हीच्या अतिवापराचे दुष्परिणामही घराघरातून दिसून येत आहेत. कोणी किती वेळ टिव्ही पाहावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु मनोरंजनाच्या नावाखाली सुरु राहाणारा चोवीस तास टीव्ही हा मनस्वास्थ्य बिघडवणारा आहे हे नाकारता येत नाही. अशावेळी ट्रायच्या नव्या दरपत्रकानुसार काही ठराविक चॅनल्सच पाहाण्याची मुभा मिळाली तर हाती रिमोट घेऊन सतत चॅनल्स बदलत राहाण्याचे व्यसन कमी होऊ शकेल. आणि टीव्ही सोबतच पाहाणाऱ्यांच्या शरीराला , डोळ्याला आणि मेंदूलाही आराम पडेल. केबल चालकांनी चार पाच तास ब्लॅकआऊट ठेवून चॅनल्स नसण्याचेही काही फायदे आहेत. हे यानिमित्ताने लक्षात आणून दिले. याचा कित्येक टीव्ही प्रेक्षकाने आपापल्या बुध्दीनुसार विचार करायला हरकत नाही. केबल चालकांचे आंदोलन आणि त्यांच्यावर होत असलेला अन्याय याबाबत काही ना काही निर्णय होईलच. परंतु मर्यादित चॅनल्स आणि मर्यादित पैसे या संकल्पनेमुळे जर टीव्ही पाहाण्याच्या व्यसनावर नियंत्रण येणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. केबल ब्लॅकआऊटच्या आंदोलनातला सकारात्मक भागही विचारात घेतला पाहिजे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More