वृत्तविहार : काश्मीर समस्येची उकल – eNavakal
Uncategoriz

वृत्तविहार : काश्मीर समस्येची उकल

केंद्रीय गृहमंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी काश्मीर प्रश्नाला प्राधान्य दिलेले दिसते. परंतु प्रसिध्द झालेल्या माहितीवरून असे दिसते की, काश्मिरमधली राजकीय गणिते बदलण्याच्यादृष्टीने त्यांच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत ही गोष्ट खरीच आहे की, काश्मिरमध्ये असलेले मुस्लिम बहुल वातावरण एकूणच देशाच्या समतोल विकासाला धोकादायक ठरते आणि त्या मुस्लिम बहुलपणाचा गैरफायदा पाकिस्तान सतत घेत आला. दहशतवाद्यांनी त्याच स्थानिक मुस्लिमांचा बुध्दीभेद करून तुम्ही भारताचे नागरीक नाहीत इथपासून ते भारत तुमचा शत्रू आहे. अशा प्रकारचा विषारी प्रचार चालवला. त्याचा सातत्याने भडीमार केला गेला. आता तर तिथली युवा पिढी हातात दगड घेऊनच भारतीय लष्करावर तुटून पडताना दिसते कारण त्यांच्या मनामध्ये सतत भारत द्वेषाचे बीज पेरले गेले. तिथले हे वातावरण बदलण्याची आवश्यकता आहे. काश्मीर हा जर भारताचा अविभाज्य अंग असेल तर तिथल्या नागरीकांनासुध्दा आपण या देशाचे अविभाज्य घटक आहोत असे मनापासून वाटले पाहिजे. या वातावरणाची निर्मिती करण्याकरीता पूर्वीप्रमाणे प्रामुख्याने श्रीनगर खोऱ्यामध्ये असलेल्या काश्मिरी पंडितांची संख्या वाढवली पाहिजे त्यांना दहशतीच्या जोरावर हुसकावून लावण्याचे कारस्थान केले गेले. जवळपास तीन ते चार लाख काश्मीर पंडीत आपले स्वतःचे घरदार सोडून निर्वासिताच्या भूमिकेत दिल्ली, मुंबई आणि देशाच्या इतर भागामध्ये राहतात. पिढ्यानपिढ्या मुस्लिमांबरोबर एकोप्याने राहणाऱ्या काश्मीर पंडितांना दहशतवाद्यांनी हुसकावून लावले त्यांच्यावर अत्याचारही केले. काश्मीरचा प्रश्न राजकीय आहे, असे म्हणत असतानाच तिथला सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम दहशतवाद्यांनी केले. म्हणूनच आता प्राधान्यक्रमाने काश्मीरमध्ये त्यांचे पुनर्वसन करून वातावरणात सुधारणा करता येऊ शकते. अमित शहा यांनी काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले तर ते जास्त योग्य ठरेल. केवळ विधानसभेच्या मतदार संघांची पुनर्रचना करून काम भागणार नाही. अनेक वर्षापासून आपल्या घर आणि गावाबाहेर असलेल्या काश्मिरी पंडितांना मुख्य प्रवाहात आणत असताना तिथला सामाजिक सलोखा टिकवण्याचे आव्हानही शहा यांना करावे लागेल. अर्थातच फारुख अब्दुल्ला किंवा मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या सत्तालोलुपांना ही गोष्ट मान्य होणार नाही. ते त्याविरुध्द आकांडतांडव करतील आणि काश्मीर प्रश्न सुटण्याऐवजी तो चिघळत कसा राहील असाच त्यांचा प्रयत्नही राहील. हा सर्व प्रयोग करीत असताना सावधानता बाळगावी लागेल. पाकिस्तानच्या मदतीशिवाय आणि स्थानिक फुटीरतावाद्यांना महत्त्व न देता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणाव्या लागतील. तर अनेक वर्षे धगधगत असलेला हा प्रदेश खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेऊ शकेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More