वृत्तविहार : काँग्रेसयुक्त भाजपा – eNavakal
लेख

वृत्तविहार : काँग्रेसयुक्त भाजपा

निवडणुका आल्यानंतर त्याला हिंदीमध्ये उथलपुथल म्हणतात. तसा आयाराम, गयाराम प्रकार देशभरच सुरु झाला आहे. त्यात महाराष्ट्र अपवाद राहू शकत नाही. राजकारण हा सत्तेचा बाजार असल्यामुळे जिकडे जास्त भाव मिळेल तिकडे राजकारणातले हे व्यापारी आणि दलालफिरत असतात. ऐनवेळची संधी साधून वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करणारे हे लोक म्हणजे तत्वाला किंवा विचाराला केराची टोपली दाखवतात. अर्थात राजकारणात तत्व आणि विचार शिल्लक राहिलेले नाहीत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना राजकारणाचा असाच बाजार झाला. पक्षामध्ये बोटावर मोजण्याइतके नेते प्रामाणिक जरी असले तरी पक्षाचा कारभार हा त्यांच्या विचारानुसार चालत नसतो. सत्ता टिकवण्याकरीता जो कोणी उपयोगी पडेल त्याची मदत घेऊन पक्षाचे कामकाज चालू राहाते. सध्या महाराष्ट्रात अशीच उथलपुथल सुरु झाली. आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या म्हणजेच विरोधी पक्षनेत्याच्या मुलालाच म्हणजेच सुजय विखे पाटील यांना आपल्या पक्षात सामिल करून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रचंड आटापीटा केला. तर तिकडे गुजरातमध्ये काही काँग्रेस आमदारांनाच आपल्या पक्षात खेचून आणण्याचा प्रयत्न केला गेला. विखे पाटील घराण्याची एकूण परंपरा पाहिली तर पक्ष बदलणे हा त्यांचा सवयीचा भाग दिसून येतो काँग्रेसमध्ये असलेले बाळासाहेब विखे पाटील वाजपेयींच्या काळात शिवसेनेत आले. केंद्रातले सरकार पडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेवर निवडून आले. मंत्रीही झाले. त्यांनाच विरोधीपक्ष नेते पद देऊन त्यांची सत्तेची भूकही शमवली गेली. परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही.हीच सत्तेची ज्यादा भूक शमवण्याकरीता त्यांच्या मुलाने भाजप प्रवेशाचा सोहळा घडवून आणला. सुजय विखे पाटील यांनी आपण वडिलांच्या निर्णयाविरोधात हा प्रवेश करीत आहोत परंतु तो देखावा असतो. राजकारणात बरीच वर्षे काढलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आपले साम्राज्य शाबूत ठेवण्याकरीता मुलाला भाजपा प्रवेशाची दीक्षा दिलेली आहे. कदाचित तेसुध्दा स्वतः पक्षांतर करून अन्यत्र स्थानापन्न होण्याची शक्यता आहे. एक जागा वाढू शकेल. आणि काँग्रेसला धक्का देता येईल या उद्देशाने भाजपाकडून ही खेळी केली गेली. परंतु यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय या पक्षासाठी तेवढाच डोकेदुखी निर्माण करणारा ठरू शकतो. सध्या भाजपामध्ये 30 ते 40 टक्केलोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत असे म्हणणारा हा पक्ष आता काँग्रेसयुक्त भाजपा अशा टप्प्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More