वृत्तविहार : एमटीएनएलला दिवाळखोरीचे वेध – eNavakal
लेख

वृत्तविहार : एमटीएनएलला दिवाळखोरीचे वेध

एमटीएनएलसारखी सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणारी दूरध्वनी सेवा जवळपास मोडीत निघाल्यासारखी परिस्थिती आहे. तिथे सुरु केलेली कामगार कपात स्वेच्छा निवृत्तीच्या योजना तसेच एमटीएनएलच्या कारभारामध्ये आलेला प्रचंड विस्कळीतपणा सध्या कामगारांप्रमाणेच एमटीएनएलच्या कामगारांना त्रास देणारा ठरत आहे. अर्थात ही सरकारी कंपनी असल्यामुळे नेटवर्क न मिळणे , आप कतार मे है, किंवा आपण संपर्काबाहेर आहात अशा प्रकारची टेप अनेकवेळा ग्राहकांना ऐकावी लागते. तरीसुध्दा लोकांनी एमटीएनएलचे मोबाईल किंवा लँडलाईन फोन अजूनही चालू ठेवले आहेत. वेळअडचणीला किंवा घरातल्या ज्येष्ठांना या फोनची सवय असल्यामुळे तो कायम ठेवला जातो. परंतु ही कंपनीच सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर असल्यामुळे आता रेंज न मिळणे नित्याचा प्रकार होत आहे. पैशाची कमतरता असल्यामुळे एमटी एनएलचे टॉवर्स ज्या सोसायट्यांच्या आवारात लावले गेले त्यांची बिले न दिले गेल्यामुळे आता हे टॉवर्सही निकामी ठरल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक सोसायट्यांनी एमटीएनएलकडे आपल्या थकित भाड्याची मागणी केली आहे. पण त्याचीही पूर्तता होऊ शकली नाही. एकीकडे केंद्र सरकार आपल्या कार्यक्षमतेचा डांगोरा पिटत असताना आणि देशात रोजगार वाढल्याचे ढोल बडवत असताना दुसरीकडे स्वतःचीच एक प्रतिष्ठित कंपनी दिवाळखोरीच काढण्याची वेळ यावी आणि अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचेसंकट थोपवावे हा विरोधाभासच म्हणावा लागतो. सध्या माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील कोणतीही कंपनी तोट्यात जाण्याची शक्यता नसते. दूरसंचार क्षेत्रातल्या अनेक खाजगी कंपन्या गडगंज नफा कमवीत असताना एमटीएनएल तोट्यामध्ये जावी किंवा तीच परिस्थिती बीएसएनएलची व्हावी हा केवळ सरकारी कामाचा खेळखंडोबा म्हणावा लागतो. सरकारने निदान सामान्य माणसांना उपयोगी पडणारी एखादी तरी संस्था नफ्यामध्ये चालवून दाखवावी. तरच सरकारच्या कार्यक्षमतेची थोडीफार खात्री वाटू शकेल. एमटीएनएलवर आलेले हे संकट खरे तर कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन परतवून लावायला हवे. परंतु तिथल्या कर्मचारी संघटनादेखील ढेपाळलेल्या दिसतात. आणि एमटीएनएलचे फुकट टेलिफोन वापरणारे खासदारसुध्दा या दिवाळखोरीबद्दल मूग गिळून बसलेले दिसतात. कारण ही सेवा सामान्याच्या उपयोगाची आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते. हीच सेवा जर बड्या धेंडाना उपयोगी पडली असती तर ती वाचवण्याकरीता सरकारने सर्व प्रयत्न केले असते. एअर इंडिया तोट्यात असूनही ती बड्या धेंडांना उपयोगी पडते म्हणून बरोबर चालवली जाते. हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. साठ हजार कोटीचा तोटा असूनही एअर इंडियामध्ये सरकार पैसे टाकत राहाते. आता वेगवेगळ्या मालमत्ता विकून एअर इंडिया वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. एअर इंडिया बंद पडणार नाही याची पूर्ण काळजी सरकारतर्फे घेतली जात आहे कारणत्याचा संबंध श्रीमंतांशी आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More