वृत्तविहार – इतर धागेदोरेही तपासा – eNavakal
लेख

वृत्तविहार – इतर धागेदोरेही तपासा

पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊन काम करू शकतो किंवा शत्रू राष्ट्राकडून गोपनीय माहिती मिळवण्याकरीता कोणत्याही पध्दतीचे डावपेच खेळले जाऊ शकतात. याचे ताजे उदाहरण म्हणून नागपूरमध्ये निशांत अगरवाल या अभियंत्याला झालेल्या अटकेचे देता येते. आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या या
तरूणाची नागपूरमधल्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणजेच डीआरडीओमध्ये नियुक्ती झाली होती. मुळचा उत्तरप्रदेशमधला हा तरूण गेली चार वर्षे ब्रह्मोस या क्षेपणास्त्राच्या प्रकल्पावर काम करीत होता. परंतु अतिशय गोपनीय स्वरुपाची माहिती तो पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेला पुरवित असल्याची माहिती मिळाली. सतत चार महिने त्याच्या सगळ्या हालचालींवर पाळत ठेवली गेली. आणि त्याच्याकडून काम करताना गोपनियतेचा भंग होत असल्याचे दिसून आले. चारच महिन्यापूर्वी त्याचे लग्नही झाले होते. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर डीआरडीओसारख्या तितक्याच मोठ्या संस्थेत मिळालेली नोकरी या सगळ्या गोष्टी पात्रतेपेक्षा जास्त काही देणाऱ्या ठरल्या असाव्यात. साधारणपणे संरक्षण किंवा सुरक्षिततेशी संबंधित विभागात काम करणाऱ्यांवर शत्रूराष्ट्रातल्या गुप्तहेरांचेही लक्ष असते. कोणत्या तरी कारणाच्या निमित्ताने निशांत अगरवाल या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेला दिसतो. आणि त्याला मोठे आमिष दाखवून गोपनिय माहिती मिळवण्यात हे लोक यशस्वी झालेले दिसतात. यातला महत्वाचा भाग असा आहे की निशांतच्या या सगळ्या काळ्या कृत्यांची माहिती सर्वप्रथम उत्तरप्रदेश पोलिसांना लागली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने पुढची कारवाई संयुक्तपणे केली गेली. काही दिवसापूर्वी सीमासुरक्षा दलाचा जवान अच्युतानंद मिश्रा यालाही पोलिसांनी अटक केली होती. एका महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तो काही माहिती गोळा करीत असे. अगरवाल देखील या मिश्राच्या संपर्कात होता. प्रामुख्याने क्षेपणास्राविषयीची माहिती स्वतच्या लॅपटॉपवर घेऊन ती त्याने आयएस आयला देण्याचा आरोप केला गेला आहे. पुढच्या काही दिवसात यासंदर्भातली बरीच माहिती बाहेर येईल परंतु आपल्याच देशातील माणसे अशा प्रकारची माहिती फोडू शकतात याचे आश्चर्य वाटते. चाळीस वर्षापूर्वी दिल्लीमध्ये अशीच हेरगिरी करणारे प्रचंड मोठे कारस्थान उघड झाले होते आणि त्यात संरक्षण खात्यातील बडे अधिकारी सहभागी असल्याचे आढळून आले होते. त्यातही ललित नारायण मिश्र नावाचा अधिकारी सूत्रधार होता. अमेरिकेच्या सीआयए संस्थेलाही काही माहिती विकल्याचा त्यावेळी गौप्यस्फोट झाला होता. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा या अशा संरक्षण क्षेत्रातील हेरगिरीचे प्रकरण पुढे आले आहे. भारतीय तपास यंत्रणांनी ते शोधून काढले. ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद ठरते. भारत पाकिस्तानचे संबंध ताणलेले असताना पाकिस्तानला मदत करणारा असा जर प्रकार घडत असेल तर त्याचा तितक्याच कठोरतेने तपास झाला पाहिजे. आणि त्याच्याशी संबंधित
इतर धागेदोरेही शोधले गेले पाहिजेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

शासनाने अनुदानरुपाने साखर कारखान्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे

नारायणगाव – सध्या साखरेचे दर निचांकी पातळीवर खाली आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर उपपदार्थाचेही दर कमी झाले असल्याने सर्वच साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More