वृत्तविहार : आर. के. स्टुडिओ आणि पैसा – eNavakal
लेख

वृत्तविहार : आर. के. स्टुडिओ आणि पैसा

मुंबईच्या चेंबूरमधील आर.के स्टुडिओच्या जागेवर आता गृहप्रकल्प उभा राहणार आहे. राज कपूर यांच्या कारकिर्दीने गाजलेला हा स्टुडिओ चित्रपटाशी संबंधित स्मृती जपण्यासाठी राखून ठेवला जावा, अशी अनेकांची भावना होती. याठिकाणी एखादे म्युझियम व्हावे अशीदेखील मागणी केली. परंतु गोदरेज कंपनीबरोबर करार करून कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ गोदरेज यांना दिला असेल तर त्यांच्या या संदर्भातल्या भावना काय स्वरुपाच्या आहेत हे सहज लक्षात येते. जर कपूर कुटुंबियांनाच हा ऐतिहासिक स्टुडिओ जपला जावा असे वाटत नसेल तर बाकीच्यांनी उसना आवेश आणून आर. के स्टुडिओ किंवा राजकपूरांच्या चित्रपटाविषयी अनाठायी प्रेम दाखवण्याचे कारण उरत नाही. अखेर मनोरंजन हे क्षेत्र समाजसेवेसाठी चालवले जात नाही. तिथे पैशाचाच खेळ चालतो. राज कपूर यांनी कितीही दर्जेदार चित्रपट निर्माण केले असले तरी त्यातून बख्खळ पैसा कमावला हे सत्यही नाकारता येत नाही. त्यांच्या चित्रपट निर्मितीमुळे फार मोठे समाजपरिवर्तन झाले असादेखील अर्थ काढता येत नाही. समाजाच्या प्रबोधनासाठी चित्रपटांचा कोणताही मोठा परिणाम साधला जात नाही. केवळ मनोरंजनाच्या उद्दीष्टांसाठी जमीनींवर हे स्टुडिओ उभारले जातात आणि त्याचा वापर त्याच्याशी संबंधित गोष्टींसाठीच केला जातो. वर्षानुवर्षे आर. के स्टुडिओमध्ये कामगार म्हणून काम केलेल्या लोकांचा काय विचार केला गेला हेही एकदा तपासले पाहिजे. त्यातील काही चौरस फूट जागा एक दोन कामगारांसाठी जरी वापरली गेली असती तरी त्यामागचा सामाजिक उद्देश साधता आला असता परंतु यापैकी काहीच झालेले नाही. याचा अर्थ ही जागा ज्या व्यापारी कारणांसाठी वापरली जात होती. त्याच व्यापारी हेतूने विकली गेली हा त्यातला मतितार्थ आहे. राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर याने आम्हाला काळाबरोबर चालणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया देऊन पैशाला महत्त्व दिल्याचे स्पष्ट होते. अशावेळी सामान्य प्रेक्षकांनी किंवा या क्षेत्राशी संबंधित लोकांनी आर. के स्टुडिओविषयी अनाठायी प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही गरज नाही. चित्रपट हे क्षेत्र इतके धंदेवाईक झाले आहे की, तिथे कोणत्याही मूल्यांना किंमत राहिलेली नाही. म्हणजेच जिथे मूल्यसुध्दा विकली जातात तिथे अशा ऐतिहासिक वास्तूंची काय किंमत होत असेल याचा सहजपणे अंदाज येतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More