वृत्तविहार – आयुष्याचा खेळ करणारे शिक्षण – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

वृत्तविहार – आयुष्याचा खेळ करणारे शिक्षण

शिक्षण हे जीवनाचे सर्वस्व नाही. शिक्षण हे जीवन प्रवासाचे साधन किंवा माध्यम आहे अशा उद्देशाने विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्याची आता वेळ आली आहे. कोणतीही परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे दडपण त्यांना उत्साहाऐवजी नैराश्याकडे घेऊन जाताना दिसते. परीक्षेतल्या यशावरच किंवा पास होण्यावरच त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखण्याचा प्रकार तातडीने बंद करण्याची वेळ आली आहे.

मुंबई विद्यापीठात असाच विचित्र प्रकार घडला आणि बोरिवलीच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या रिध्दी परब या विद्यार्थीनीला बॅचलर ऑफ अकाऊंटींग अँड फायनान्स या तिसऱ्या वर्षाच्या विषयाला केटी लागली. संपूर्ण शिक्षणाला एकदाही केटी न लागल्याने ही गोष्ट तिच्या मनाला खूप मोठा धक्का देणारी ठरली. एकाच विषयात केटी लागली म्हणून तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. परंतु त्याची वाट न पाहताच तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि पुनर्मूल्यांकनामध्ये ती उत्तीर्ण झाल्याचे आढळून आले. मुंबई विद्यापीठाच्या कारभाराचा सगळ्याच पध्दतीने बोजवारा उडाला आहे. उत्तरपत्रिकांची  पुनर्तपासणी करताना जर अशा प्रकारचा बेजबाबदारपणा केला जात असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होत असेल तर ही गोष्ट आणखीनच धक्कादायक ठरते. जर आधीच उत्तरपत्रिका नीट तपासली गेली असती तर ही दूर्घटना घडू शकली नसती. यावरून अभ्यास आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या मनावर होणारे ताणतणाव किती गंभीर स्वरुपाचे असतात हे स्पष्ट होते. अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर तर इतका विचित्र परिणाम होतो की त्यांना पुढच्या शिक्षणाचाही मार्ग बंद झाल्यासारखे वाटू लागते. ज्या शिक्षणाचे बोट धरून आयुष्यात काही साध्य करून दाखवण्य़ाची जिद्द असते ते शिक्षणच बेजबाबदारपणे या विद्यार्थ्यांची बोटे अर्ध्या रस्त्यावरच सोडून देते आणि मग अनेकांची भरकटल्यासारखी अवस्था होते. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणाचे उद्दीष्ट महत्व हेदेखील शिक्षणाबरोबरच शिकवण्याची वेळ आली आहे असे म्हणण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.

केवळ कॉलेज किंवा विद्यापीठांकडून दिले जाणारे गुण म्हणजे आपली गुणवत्ता नसते. तर आपण प्राप्त केलेले ज्ञान आणि जीवनात प्राप्त केलेला विविध प्रकारचा अनुभव यापेक्षाही मोठी गुणवत्ता प्राप्त करून देऊ शकतो. शिक्षणाचे केवळ साहाय्य घेतले जावे . आपल्या जीवनात शिक्षणाचा उपयोग करून घेतला जावा शिक्षणासाठी आपले जीवन व्यर्थ घालवण्याचा मूर्खपणा कोणीही करू नये. अशा प्रकारच्या समुपदेशनाची आज गरज वाटू लागली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More