वृत्तविहार : आगींची शृंखला सुरूच – eNavakal
लेख

वृत्तविहार : आगींची शृंखला सुरूच

दोन दिवसांपूर्वी अंधेरी इथल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या दहावर पोहोचली आहे. एकीकडे मुंबईतही थंडीचा कडाका वाढला असतान चक्क आगीच्या घटनांमध्येही वाढ ह्वावी हे आश्चर्यकारक ठरते. कारण ही आग लगली त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझगाव इथल्या किंग ऑफ केपसॉ हॉटेल अफझल इथे आग लागली. यात कोणतीही जिवितहनी झाली नसली तरी बरेच मोठे नुकसान तिथे झाले. त्यानंतर दक्षिण मुंबईतल्याच नरिमन पॉईंटमधल्या प्रसिद्ध हॉटेल ट्रायडंटला अशीच मोठी आग लागल्याने बरेच नुकसान झाले. त्यापाठोपाठ आज वरळी दूरदर्शन केंद्राच्या कॉमन ट्रान्स्मिशन सेंटरला आगीचा फटका बसला आणि एफ्. एम्. चॅनेलचे प्रक्षेपण बंद करावे लागले. म्हणजे उन्हाळ्यात आगी लावण्याचे जे प्रमाण असते तसेच प्रमाण आताही दिसते आहे. आगी लागण्याचे हे सलग प्रकार एका अर्थी चिंताजनक म्हणायला हवे. कारण केवळ शॉर्ट सर्किट किंवा काहीतरी तांत्रिक कारणांमुळे या सगळ्या आग लागत असतील यावर विश्वास ठेवता येत नाही. अचानकपणे आणि सलग जेव्हा या पद्धतीच्या आगी लागतात त्यावेळी त्यामागे काही प्रमाणात का असेना घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.  आता थंडीच्या दिवसामध्ये अशा आग लागतात आणि शॉर्ट सर्किटचे कारण सांगून त्यावर आपण समाधान मानून घेतो. इथेच आपली चूक होते. कारण यामागे काही विशिष्ट व्यक्ती आपला हेतू साध्य करून घेण्याची शक्यता असते. आणि त्याचा शोधही घणे गरजेचे वाटू लागते. सरकारी यंत्रणा किंवा पोलिसांना अशा घटनांमागे घातपात असू शकेल असे वाटते की नाही हे कोणीही सांगू शकणार नाही. काही ना काही कारणाने हे प्रकार घडत असतात आणि त्याविषयी फार गांभीर्य बाळगण्याचे काही कारण नाही. अशी त्यांची सर्वसाधारण मनोवत्ती असते. दुर्दैवाने यातूनच घातपात करणारे संधी शोधत असतात आणि योग्य वेळ आली की ते आपला उद्देशही साध्य करून घेतात. मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरात सलग अशाप्रकारच्या घटना घडणे धोकादायक ठरते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More