वृत्तविहार : अन्यथा औषधापेक्षा इलाज भयंकर – eNavakal
लेख

वृत्तविहार : अन्यथा औषधापेक्षा इलाज भयंकर

देशातील वेद्यकीय व्यवसायाला तसेच वैद्यकीय शिक्षणाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक वर्षापासून असलेली वैद्यक परिषद बरखास्त केली आणि आता त्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन केला जाणार आहे. त्याबाबतचे विधेयक लोकसभेत चर्चेला येऊ घातले आहे. हे विधेयक देशभरातील डाॅॅक्टरांवर अन्याय करणारे आहेत. सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी डाॅॅक्टरांची बाजू ऐकून घेतली गेली पाहिजे अशी मागणी देशभरातील डाॅॅक्टरांनी केली आहे. त्यासाठी एक दिवसाचे कामबंद आंदोलनही केले होते यासंदर्भात त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत हे तपासले गेले पाहिजे कारण या नव्या विधेयकाने वैद्यकीय व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या, दवाखान्यांमधील तपासण्या, वेगवेगळ्या तपासण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याबाबतचे धोरण याच महाविद्यालयांमध्ये जागा ठरवण्याचा अधिकार तसेच तेथील शुल्क निश्चितीची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांबाबत पुरेसा खुलासा होणे अपेक्षित आहे. सरकारने यासंदर्भात डाॅॅक्टरांच्या अधिकृत संघटनेशी चर्चा केली आहे का किंवा हे विधेयक मांडण्यापूर्वी संबंधितांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत का याचाही उलगडा झाला पाहिजे. केवळ संसदेतल्या लोकप्रतिनिधींच्या भरोशावर या विधेयकाचे भवितव्य ठरवले जाणे संयुक्तिक ठरणार नाही. कारण लोकांच्या आरोग्याशी संबंधित हे विधेयक अधिक काळजीपूर्वक तपासले गेले पाहिजे. जर विधेयकाबाबतच शासकीय स्तरावर उदासिनता दाखवली गेली किंवा हेकेखोरपणा केला तर औषधापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ येईल. सरकारला वैद्यकीय क्षेत्राची व्यापकता वाढवायची आहे. वैद्यक परिषदेचा कार्यविस्तार करून तिला आयोगाच्या समकक्ष आणायचे आहे. परंतु हे करीत असताना आयोगासारखीच स्वायत्तता दिली पाहिजे. ती देताना वारंवार राजकीय हस्तक्षेप होणार नाही हेही बघावे लागेल खरे तर सध्या वैद्यकीय क्षेत्रात घुसलेला धंदेवाईकपणा किंवा त्याचे झालेले व्यापारीकरण रोखण्याची कोणती उपाययोजना या विधेयकात आहे हे लोकांना समजले पाहिजे आणि तेच या विधेयकाचे मर्म ठरते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More