वृत्तविहार : अक्षम्य संवेदनहीनता    – eNavakal
लेख

वृत्तविहार : अक्षम्य संवेदनहीनता   

रस्ते अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही. पंढरपूर सोलापूर मार्गावर झालेल्या अपघातात घाटकोपरच्या सहा जणांचे गेलेले बळी आणि त्याचवेळी राज्याच्या इतर भागात झालेले गेल्या आठवड्यातले काही अपघात यामध्ये किमान दहा जणांचे जीव गेले आहेत. सरकार मोठमोठ्या घोषणा करीत असताना युध्दपातळीवर अपघात नियंत्रणात आणले पाहिजेत. अशी कोणतीही निकड सरकारला वाटू नये. यावरून शासकीय कारभारातला माणूसकीशून्यपणा लक्षात येतो. प्रामुख्याने वाहन अपघातांमध्ये जाणारे बळी हे रस्त्यांची दुर्दशा आणि वाहनचालकाचा बेदरकारपणा हीच त्यामागची मुख्य कारणे असतात. अशावेळी रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला सरकारकडून होणारा विलंब किंवा त्यासाठी जाणारा प्रचंड कालावधी फार नुकसानकारक ठरतो. अशावेळी निदान वाहतुक पोलिस किंवा स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन रस्त्यांवर गस्तीपथके तैनातकेली पाहिजेत.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि अपघात झाला म्हणून काही मिनीटात सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे या गस्तीपथकामुळे शक्य होऊ शकेल. यासाठी फार मोठे मनुष्यबळ लागेल यात काही शंका नाही. परंतु रस्त्यांची बांधकामे करीत असताना त्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा गस्तीपथकांच्या माध्यमातून अपघात नियंत्रणात आणणे खूप सोपे आहे. खरे तर महामार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच क्लोज सर्किटच्या माध्यमातून अथवा सेन्सर पध्दतीने वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणता येऊ शकते. पण त्याहीपेक्षा  गस्तीपथके जर सतत फिरत राहिली तर बराच मोठा परिणाम साधला जाईल. परंतु या प्राथमिक गोष्टीकडेसुध्दा सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणूनच या वाढत्या रस्ते अपघातांची पूर्ण जबाबदारी सरकारचीच आहे असे म्हणणे भाग पडते. कारण छोट्या छोट्या उपायांमधूनही हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात. सरकार त्याची गांभिर्याने दखलच घ्यायला तयार नाही. आणि म्हणून कोणतेच ठोस उपाय न करण्याबाबतचा हा हलगर्जीपणा लोकांच्या जीवाशीच खेळ करणारा ठरला आहे. संपूर्ण देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. आणि त्यात दीड लाखापेक्षा जास्त लोकांचे प्राण जातात. महाराष्ट्रात दरवर्षी दहा ते पंधरा हजारलोकांचे बळी जातात आणि अपघातांची संख्या चाळीस ते पंचेचाळीस हजार असते. ही गोष्ट सरकारच्या जर लक्षात येत असेल तर न्यायालयाने हस्तक्षेप करून सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. कारण अशा प्रकारची संवेदनहीनता राज्यकर्त्यांकडून अपेक्षित नाही. ते आपल्याकर्तव्यात कसूर करत आहेत. त्याची जाणीव न्यायालये करून देऊ शकतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई – मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली आहे. या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्यात जवळपास ५० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More