वृत्तविहार : अंदाजपत्रकाबाबतचे अंदाज                – eNavakal
लेख

वृत्तविहार : अंदाजपत्रकाबाबतचे अंदाज               

सरकारचा अंदाजपत्रकाचा हँगओव्हर अजून उतरलेला दिसत नाही. कारण अंदाजपत्रकात जाहीर झालेल्या अनेक घोषणांबद्दल लोकांच्या मनात बराच गोंधळ आहे. पाच लाखापर्यंत करमाफी हीदेखील एक गुगली असून त्यातल्या काही छुप्या तरतुदींमुळे थेट पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करपात्र नसेल असे आता तरी म्हणता येत नाही. तीच परिस्थिती शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांबाबत आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात तीनवेळा दोन दोन हजाराचे हप्ते जमा होतील. म्हणजेच दिवसाला साधारण सतरा रुपये दक्षिणा शेतकऱ्याला देण्याचा उदारपणा हाही तितका प्रामाणिक नसल्याचा शेतकऱ्यांचाच अंदाज आहे. कारण या योजनेसाठी नेमके कोणते शेतकरी पात्र असतील आणि या सतरा रुपयाने शेतकऱ्यांना कोणतीही मोठी मदत होणारी नाही. उलट शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचाच हा प्रकार ठरतो.

ही रक्कम महिन्याला दोन हजार असली पाहिजे. म्हणजेच वर्षाला किमान चोवीस हजार रुपये अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळू शकेल. त्यातही कोरडवाहू शेती करणाऱ्याला महिन्याकाठी किमान दोन हजार रुपये खर्चासाठी मिळू शकतील. आज आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कोरडवाहू शेती करणारे शेतकरी सर्वाधिक आहे. कारण सावकाराचे कर्ज घेऊन शेती करूनही त्यांना कोणताच नफा होत नाही. त्यावेळी स्वतःच्या कुटुंबाचा खर्चही तो भागवू शकत नाही. अशा अडीअडचणीच्यावेळेला ही महिना दोन हजाराची मदत उपयुक्त ठरू शकेल. यासंदर्भात सरकारवर चारही बाजूंनी टिका झाली. त्यावेळी या सहा हजाराच्या रकमेत वाढ होऊ शकेल अशी सारवासारव करायला सरकारने प्रारंभ केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सादरझालेल्या या अंदाज पत्रकाचा हा तर एक ट्रेलर आहे असा उल्लेखकरून निवडणुकीनंतरच्या अंदाजपत्रकात आणखी घसघशीत सवलती दिल्या जाण्याची शक्यताच बोलून दाखवली आहे. म्हणजेच आताच्या अंदाजपत्रकामध्ये असलेल्या अनेक त्रूटी असल्याचे एकाअर्थी मान्य केले आहे. अंदाजपत्रक हा मुळातच आकडेवारीचा खेळ असतो. त्यामध्ये अनेक सुधारणा कराव्याच लागतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंदाजपत्रकातल्या अनेक तरतुदी लोकांपर्यंत पोहचायला बराच काळही जातो. त्यावेळचे अंदाजपत्रक हे निवडणुक अंदाजपत्रक असल्याने लोकांची मते सहजपणे आपल्या पारड्यात पडावीत म्हणून त्या पध्दतीच्याच आकड्यांचे खेळ केले आहेत. आता जेव्हा प्रत्यक्ष त्याचे तपशिल समोर येतील तशतशा त्यातल्या त्रूटीही लक्षात येऊ लागतील. थोडक्यात सांगायचे तर घसघशीत सवलती देणाऱ्या अंदाजपत्रकाबाबत लोकांनाही अंदाजच लावावा लागतो आहे. म्हणजे त्यात दिलेल्या सवलती आपल्याला खरोखर मिळतील की नाही याचा त्यांना अजूनही अंदाज आलेला दिसत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More