वृक्ष प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्यास हायकोर्टाचा नकार – eNavakal
News

वृक्ष प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई – तज्ज्ञव्यक्तींची समिती नसल्याने वृक्ष प्राधिकरणाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्याची विनंती करणार्‍या मुंबई महापालीकेला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणाका दिला. सुटीकाली न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने जोपर्यंत तज्ज्ञ व्यक्तींची कमिटीवर नियुक्ती केली जाणार नाही तोपर्यंत वृक्ष तोडीबाबत पालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावेत असे स्पष्ट करत प्राधीकरणावर घालण्यात आलेली स्थगिती उठविण्यास नकार दिला. न्यायालयाच्या या भुमिकेमुळे मुंबईतील विकास कामे रखडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आरेतील वृक्षतोडीला परवानगी असली तरी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मेट्रो तसेच पालिकेला दिले आहेत.आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात तोडण्यात येणार्‍या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ज्ञांचा अभाव असल्याने हायकोर्टाने 24 ऑक्टोबर 2018 रोजी न्यायालयाने समितीलाच स्थगिती दिली. ही स्थगिती उठविण्यात यावी अशी विनंती करणारा अर्ज मुंबई महापालीकेन उच्च न्यायालयात केला. त्या अर्जावर सुटीकाली न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी पालीकेच्यावतीने या समितीत चार तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचे सांगताना पावसाळा जवळ येत असून त्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे गरजेचे आहे.
मात्र परवानगी देण्यास समिती नसल्याने मुंबईतील इतर विकासकामेही खोळंबली असल्याने वृक्ष प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्यात यावी अशी विनंती केली. मात्र न्यायालयाने जोपर्यंत तज्ज्ञांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत स्थगिती उठविली जाणार नाही असे स्पष्ट करून याचिकेची सुनावणी 20 मेपर्यंत तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More