विश्वास शंकरवार उपायुक्तपदी, घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी – eNavakal
News मुंबई

विश्वास शंकरवार उपायुक्तपदी, घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी

मुंबई – महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार यांच्या खांद्यांवरील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भार कमी करून आता नवनियुक्त उपायुक्त विश्वास शंकरवार यांचया खांद्यावर टाकण्यात आला आहे. तर उपायुक्त विजय बालमकर यांना परिमंडळ-१ च्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महापालिकेच्या परिमंडळ एकचे उपायुक्त सुहास करवंदे हे सेवा निवृत्त झाल्यामुळे यापदावर गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचा पदभार समर्थपणे सांभाळणाऱ्या विजय बालमवार यांची बदली करण्यात आली आहे. विजय बालमवार हे आपल्या मागील दोन वर्षांपासून आपल्या बदलीसाठी प्रयत्नशीर होते. परंतु करवंदे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याजागी बालमवार यांची बदली करण्यात आली.

अतिक्रमण निमुर्लन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी उपायुक्तपदी बढती मिळाली आहे. उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतर हे पद  रिक्त नसल्यामुळे ते सहायक आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत होते. परंतु सुहास करवंदे निवृत्त झाल्यानंतर बालमवरांची वर्णी तिथे लागल्यानंतर शंकरवार यांच्या हाती घनकचरा विभागाच्या कारभार सोपवण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून शंकरवार यांची नियुक्त करण्यात आली आहे. या दोघांच्या बढती आणि बदलीचे आदेश शनिवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More
post-image
News क्रीडा मुंबई

मंजिरी भावसार ठरली यंदाची ‘मिस मुंबई’

मुंबई – पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र...
Read More