विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी- अशोक चव्हाण – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी- अशोक चव्हाण

नांदेड – अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही विकास काम केले नाही. महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मोदी सरकार यापुढेही काही करेल, असा विश्वास आता खुद्द जनतेमध्येच राहिला नाही. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्येच नव्हे तर देशभरात भाजपाची ओहोटी सुरू झाली आहे. असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी मांडले. मुदखेड शहरातील भोकर रोडवरील नई आबादी परिसरात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

नोटाबंदी प्रकरणातील शासनाचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दहशतवाद संपेल असा दावा केंद्र सरकारने केला होता. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन भारताचे पंतप्रधान भोजन करतात, तर दुसरीकडे देशाचे संरक्षण करणारे जवान दररोज शहीद होत असतात. मागील चार वर्षात दहशतवाद तर थांबलाच नाही, उलट त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढली आहे, या प्रकरणाला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे सांगत अशोकराव चव्हाण यांनी भाजपा सरकारवर टीका केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More