विश्वचषक स्पर्धेसाठी आयपीएलचा फायदा- डेविड वॉर्नर – eNavakal
Uncategoriz

विश्वचषक स्पर्धेसाठी आयपीएलचा फायदा- डेविड वॉर्नर

हैदराबाद –  स्पर्धेत खेळल्याचा लाभ आपल्याला नक्कीच विश्वचषक स्पर्धेसाठी मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.  आयपीएल स्पर्धेत विश्वातील सर्वच अव्वल खेळाडू खेळत असल्यामुळे तुम्हाला चांगली स्पर्धा बघायला मिळते. तसेच खेळाडूंना स्पर्धेत बरेच काही नवेनवे शिकायला मिळते. चांगल्या खेळाडूंचा खेळ बघून तुम्हीदेखील आपल्या खेळात बरीच सुधारणा करू शकता, असे वॉर्नरने सांगितले.
या स्पर्धेत खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजीला साथ देणार्‍या खेळपट्ट्यांवर खेळताना तुमची कसोटी लागते. पण या दोन्ही खेळपट्ट्यांवर खेळून तुम्ही आपल्या फलंदाजीत सुधारणा करू शकता. विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मुकाबला तुम्ही या स्पर्धेत करत असल्यामुळे तुम्हाला नवा आत्मविश्वास फलंदाजी करताना मिळतो, असेही वॉर्नरने स्पष्ट केले. गतवर्षी त्याच्यावर बंदी असल्यामुळे आयपीएल स्पर्धेला मुकला होता. पण यंदा त्याने या स्पर्धेत धावांची बरसात करून गेल्या वर्षाची उणीवदेखील भरून काढली. इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत मोठ्या धावसंख्येचे सामने आपल्याला बघायला मिळतील. कारण जून-जुलै महिन्यांत इंग्लंडमधील वातावरणात चेंडू जास्त स्विंग होत नाही. खेळपट्ट्या काहीशा संथ असतात. ज्याचा फायदा फिरकी गोलंदाज घेऊ शकतील, असे वॉर्नरने सांगितले. गतवर्षीचे विजेते आम्ही असल्यामुळे आमचे चाहते आमच्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगून असतील. त्यांना आमचा संघ निराश करणार नाही. यजमान इंग्लंड, भारत, न्यूझीलंड हे संघदेखील जेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे वॉर्नर म्हणाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सुरू होत असलेल्या सराव वर्गात भाग घेण्यासाठी वॉर्नर आयपीएल स्पर्धा मध्येच सोडून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More