विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार – eNavakal
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती यासाठी अनेक वर्षे लढा देत आहे. काल जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार आणि आमदार रमेश पाटील यांच्या प्रयत्नाने संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची रात्री ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. यावेळी समाज कल्याण मंत्री संजय कुटे उपस्थित होते. विशेष मागास प्रवर्गाच्या दोन टक्के आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करावी अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
ट्रेंडिंग देश

आंतरराष्ट्रीय चहा दिन : सुर्रर्र के पियो!

‘सुर्रर्र के पियो’! हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थात सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहा.  अनेकांना सकाळी उठल्यावर चहा  घेतल्याशिवाय कामाची तरतरी येत नाही. हल्ली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – आज सलग तिसऱ्या दिवशी पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 5 वाजून २2 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More