विशेष इतर मागास प्रवर्गातील समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या – eNavakal
News मुंबई

विशेष इतर मागास प्रवर्गातील समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

मुंबई – राज्य घटनेनुसार नोकर्‍या, शैक्षणिक क्षेत्रासह अन्य गटांमध्ये विशेष इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी असलेले दोन टक्के आरक्षण ओबीसी कोट्यातून न देता स्वतंत्रपणे द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला नोटीस बजावत भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देेश दिले आहेत.
विविध मागास समाजघटकांना देण्यात आलेले आरक्षण 50 टक्के आहे. त्यात इतर मागास प्रवर्गासाठी 19 टक्के आरक्षण आहे. ओबीसी गटामध्ये विशेष ओबीसी गटांसाठीचा दोन टक्के कोटाही समाविष्ट करण्यात आला आहे. या दोन्ही समाजघटकांना देण्यात आलेले घटनात्मक आरक्षणही वेगळे आहे. असे असतानाही सरकारकडून ओबीसी या गटामध्येच विशेष ओबीसी गटाला आरक्षण देण्यात येते. त्यामुळे नोकर्‍या, शिक्षण, नियुक्त्या आदी बाबींमध्ये मिळणार्‍या आरक्षणात विशेष ओबीसी गटातील उमेदवारांचा स्वतंत्रपणे आरक्षण मिळवण्याचा हक्क डावलला जातो, असा आरोप याचिकादार विणकर फाऊंडेशन प्रणीत विशेष मागासवर्ग संघर्ष समितीने केला आहे. मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितिन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. याबाबत सरकारकडे अर्ज निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे याचिका केल्याचे याचिकाकत्यार्र्ंच्या वतीने सांगण्यात आले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More