विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी! सुरक्षेत वाढ – eNavakal
मनोरंजन मुंबई

विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी! सुरक्षेत वाढ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. धमकी देणारा कोण आहे, कुठून आला आहे, त्याने नेमकी काय धमकी दिली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

विवेकला काल जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून कळते. काल चित्रपट सृष्टीतील काही मंडळीसाठी विवेकच्या आगामी ‘पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक उद्या शुक्रवार 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी विवेक ओबेरॉयने एक्झिट पोलवरून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबाबत मीम शेअर केले होते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या विवेक ओबेरॉयने माफी मागितली होती. तसेच ट्विटरवर शेअर केलेली मीमही त्याने डिलिट केले होते. विवेकने 20 मे रोजी तीन फोटोचे एक मीम आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केले होते. त्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका झाली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More