विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचे उपोषण – eNavakal
News आंदोलन मुंबई

विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचे उपोषण

मुंबई – सरकारकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज माथाडी कामगारांनी आझाद मैदानावर उपोषण केले. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली माथाडी कामगारांनी आजपासून हे आंदोलन पुकारले असून शेकडो कामगारांची उपस्थिती या आंदोलनात दिसून आली. सायंकाळी ’वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आज सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले. उद्या या प्रश्नी माथाडी कामगार युनियनची मंत्रालयात मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि कामगारमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, माथाडी मंडळाच्या सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, राज्यातील 36 माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याचे धोरण थांबवणे, माथाडी मंडळात पूर्णवेळ अध्यक्ष, सचिव यांच्या नेमणूका करणे, माथाडी ऍक्ट-1969 हा कायदा देशातील इतर राज्यांना लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणे, मापाडी कर्मचार्‍यांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, कळंबोली स्टील मार्केट, पुणे, लातूर, कोल्हापूर व नाशिक येथील माथाडी कामगारांच्या समस्या सोडवणे, माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे या माथाडी कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत. माथाडी कामगारांच्या विविध मागण्या सरकारदरबारी कित्येकवेळा मांडण्यात आल्या. परंतु त्यात्यावेळी सरकारने आश्वासन दिल्याने आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले. परंतु पुढे सरकारकडून यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच आम्ही यावेळी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचे आ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी आमच्या मागण्यांबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळून त्याची त्वरीत अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. आजच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी गुलाबराव जगताप, वसंतराव पवार, ऋषिकांत शिंदे, आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, भानुदास इंगुळकर उपस्थित होते.
आज मंत्रालयात
मुख्यमंत्र्यांशी होणार बैठक
उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात माथाडी कामगार युनियनची मुख्यमंत्री, कामगारमंत्री आणि महसूलमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचे समजते. आज संध्याकाळी ’वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सरकार माथाडी कामगारांना वार्‍यावर सोडणार नाही. माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न आमचे सरकार मार्गी लावेल, असे ठोस आश्वासन मुखमंत्र्यांनी माथाडी कामगार युनियनच्या शिष्टमंडळाला दिल्याचे पाटील यांनी सांगितले. आता उद्या होणार्‍या बैठकीत नेमके काय ठरते व माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लागतात का, यावर सर्व माथाडी कामगारांचे लक्ष लागले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More