विरोधकांच्या महाआघाडीला घाबरू नका ते माझ्यावर सोडा! शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र – eNavakal
News देश

विरोधकांच्या महाआघाडीला घाबरू नका ते माझ्यावर सोडा! शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

मेरठ- आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडालेली असतानाच या महाआघाडीला न घाबरण्याचा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. महाआघाडीला घाबरू नका. विरोधकांवर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा. त्याची चिंता तुम्ही करू नका, असे सांगतानाच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये एक तरी जादा सीट जिंकून दाखवणारच, असा निर्धारही शहा यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या भाजप कार्यसमितीच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी हा निर्धार व्यक्त केला. यावेळी भाजप पदाधिकार्‍यांनी उत्तर प्रदेशात महाआघाडीचे मोठे आव्हान असल्याचे बोलून दाखवले. त्यावर शहा यांनी उत्तर प्रदेशात महाआघाडीचे आव्हानच नसल्याचे स्पष्ट केले. तुम्ही महाआघाडीची चिंता करू नका. तुम्ही फक्त योगी आदित्यनाथ सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करा. बाकी मी पाहून घेतो, असे शहा म्हणाले. उत्तर प्रदेशात बसपा, काँग्रेस आणि सपा या सर्वांना आपण पराभूत केले होते. 2017 मध्ये आपण निवडणुका लढलो त्यावेळी दोन मुलांनी हातमिळवणी केली होती. मात्र तरीही आपण 300 हून अधिक जागा जिंकलो. यावेळी तिघे जण एकत्र आले तरी आपण 74 पेक्षा कमी जागा जिंकणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More