विरारमधील झा परिवारातर्फे आज पोलिसांविरोधात ‘कॅन्डल मोर्चा’ – eNavakal
आंदोलन मुंबई

विरारमधील झा परिवारातर्फे आज पोलिसांविरोधात ‘कॅन्डल मोर्चा’

वसई -विरारच्या झा कुटुंबातील त्या दोघा भावांच्या आत्महत्या व त्याच्याशी संबंधित प्रकरणात जबाबदार असणार्‍यांवर व स्वतः पोलिसांकडून आजवर कोणतीच कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ झा कुटुंबीयांतर्फे पोलिसांच्या विरुद्ध आज वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

विरार येथील रहिवासी विकास झा व अमित झा या दोघा बंधूंवर विरार पोलसांनी केलेल्या मानसिक व शारीरिक छळामुळे 10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा याने वसईच्या उपाधीक्षक कार्यालयाबाहेर स्वतःला जाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर पुनःश्च विरार पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे विकासचा भाऊ अमित झा याने ही पोलीस कारवाईच करत नसल्याने 20 जानेवारी 2018 रोजी आत्महत्या केली.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचे पडसाद त्यावेळी वसई -विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर उमटले असताना त्यावेळी अनेक सामाजिक संघटनांनी या घटनेचा थेट निषेध केला होता. अखेर याप्रकरणी विरारचे पोलीस निरीक्षक युनूस शेख व सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र या प्रकरणाचे सबळ पुरावे असूनदेखील व वारंवार याबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे हे कोणत्याही प्रकारे कारवाई करीत नसल्याचा आरोप विकास झा व अमित झा यांचे वडील विनय कांत झा यांनी केला आहे. एकूणच या अन्यायाबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी 20 जून रोजी नालासोपारा (पूर्व) ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत एका कँडल मार्चचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती झा कुटुंबीयांकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More