विराट ‘पायरी’वर का उभा ? – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराट ‘पायरी’वर का उभा ?

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जात आहे. विराट आणि विक्रम जणू समीकरणच बनलं आहे. फलंदाजी, कर्णधारपदासह जाहिरात क्षेत्रातही त्याने एक उंची गाठली आहे. असे असतानाही एका कार्यक्रमात विराटला चक्क उंचीसाठी पायरीचा आधार घ्यावा लागला.

नुकतेच ‘टिसो क्रोनो एक्सएल क्लासिक विराट कोहली स्पेशल एडिशन’ या विशेष श्रेणीच्या मनगटी घड्याळ्यांचे अनावरण झाले. या विशेष बनावटीची केवळ ३०१८ इतकी मर्यादित घड्याळे बनवण्यात आली आहेत. कोहलीच्या पसंतीच्या ८ खेळाडूंना हे खास घड्याळ भेट देण्यात आलं. यावेळी भारताची युवा टेनिसपटू करमन कौर थंडीला घड्याळ भेट देताना विराट चक्क पायरीवर उभा राहिला. करमन कौर थंडीची उंची 5 फुट 11 इंच आहे तर विराटची उंची 5 फुट ९ इंच आहे. विराटने करमन कौर थंडीला घड्याळ देताना दोघांची उंची समान करण्यासाठी एक पायरी सोडून वर उभा राहिला. विराटचे हे कृत्य पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच हसू लागले. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी विराटला चांगलेच ट्रोल केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून सुरू होणार

पुणे- ‘आशय फिल्म क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या नववा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा...
Read More