विराट कोहली ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’, बुमरा, पुजारा, रोहितही मानकरी! – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराट कोहली ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’, बुमरा, पुजारा, रोहितही मानकरी!

मुंबई – सीएट क्रिकेट रेटिंग (सीसीआर) आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याने वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसह सर्वोत्कृष्ट फलंदाज असे दोन पुरस्कार पटकावले. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, चेतेश्वर पुजारा, स्मृती मानधना आदी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईमध्ये झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये भारतासह जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. 2018-19 वर्षांतील कामगिरीच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार सलग दुसर्‍या वर्षी पटकावणार्‍या विराट कोहलीने सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कारही आपल्या नावे केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सर्वोत्तम गोलंदाज ठरला. आघाडीच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि फटकेबाज सलामीवीर रोहित शर्मा यांना अनुक्रमे वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू आणि वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. वर्षातील सर्वोत्तम टीट्वेन्टी क्रिकेटपटूचा मान ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच याला मिळाला. याच प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाज रशीद खानने मिळवला.

सलामीवीर स्मृती मानधना हिला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (सर्वोत्तम कामगिरी), आशुतोष अमन (देशांतर्गत क्रिकेट सर्वोत्तम खेळाडू), यशस्वी जैस्वाल (सर्वोत्कृष्ट कनिष्ठ क्रिकेटपटू) तसेच श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान (क्रीडा पत्रकार) यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम योगदानाबद्दल माजी अष्टपैलू आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना सीएट जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी सीएट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतानाच पुरस्काराची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हतेबद्दल आनंद व्यक्त केला.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More