विना ओसी इमारती बांधून बिल्डर्स सटकले; रहिवासी मात्र लटकले – eNavakal
महाराष्ट्र

विना ओसी इमारती बांधून बिल्डर्स सटकले; रहिवासी मात्र लटकले

वसई – वसई- विरार मध्ये भोगवटा प्रमाणपत्र (ओ.सी) नसलेल्या इमारतीतील लाखो रहिवाश्यांना वाटते शास्तीची धास्ती  पालिका करतेय राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ; अंतिम निर्णय १७ तारखेच्या महासभेत वसई-विरार शहर महापालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सन २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता वसई-विरार शहरातील ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त नाही, त्या इमारती मधील रहिवाशांना शास्ती आकारण्यास लवकरच २०१८ -२०१९ या वित्तीय वर्षांपासून सुरवात करणार असल्याची माहिती नगररचना विभागा कडून प्राप्त झाली आहे, मात्र आश्चर्य म्हणजे सदर विषयाचा गोषवारा तर निघाला परंतु शहरात विना ओसी अशी किती बांधकामे व इमारती आहेत याची मात्र अधिकृत आकडेवारी पालिकेकडून देण्यात आलेली नाही,

या संदर्भात पालिका आयुक्त सतीश लोखंडे व नगररचना विभागाचे उपसंचालक संजय जगताप यांच्याशी संपर्क केला असता ते सभेत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले, एकूणच हा सर्व प्रकार संतापजनक नाही तर बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांकडून फसवणूक झालेल्या लाखो रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा एक प्रकार असल्याची घणाघाती टीका आता वसईतील विविध पक्षीय नेते व नागरिकांकडून होत आहे..

वसई- विरार पालिका क्षेत्रात लाखो सदनिका धारकांची छोट्या- मोठ्या बिल्डर्स व विकासक यांच्या कडून कधी अधिकृत तर कधी बेकायदा बांधकामाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे.या संदर्भात वसई विरार मध्ये विविध पोलीस ठाण्यात गुन्हे हि दाखल आहेत.तसेच कधी अधिकृत मान्यता नसताना तर कधी भोगवटा पत्र नसताना किंवा पार्ट ओसी (भोगवटा पत्र) घेऊन देखील सन २००९ पूर्वीची सिडको व त्यानंतरची महापालिका यांनी नागरिकांना त्या इमारती व सदनिकांमध्ये राहण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे पालिकेकडून अशा सदनिकांना अधिकृत घरपट्टी, नळ जोडणी तसेच महावितरणकडून वीज जोडणी सुद्धा मिळवून दिली आणि आता हीच महापालिका राज्य शासनाच्या या चुकीच्या निर्णयांची अंमलबजावणी अशा रहिवाशांना शास्ती लावून करीत आहे. ही बाब प्रचंड संतापजनक आणि गंभीर आहे, त्यामुळे हा सर्व प्रकार चोर सोडून संन्याशाला एक प्रकारे फाशी देण्याचा असल्याचे नागरिक म्हणतात.म्हणजेच स्वतः वारेमाप पैसे घेऊन बिल्डर्स सटकले आणि आता रहिवाशी मात्र लटकले.

या सर्व प्रकारामुळे अशा ओसी नसलेल्या इमारतीवर शास्तीच्या कारवाईची नागरिकांनी बऱ्यापैकी धास्ती घेतली आहे. मात्र त्यावेळी अधिकृत ,बेकायदा मजले अथवा बेकायदा इमारती होत असताना हेच बांधकाम व्यावसायिक, विकासक,त्यांचे वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) आणि महापालिका अधिकारी हे काय करीत होते. तर आज या सर्वांना वाचविण्यासाठी शासन व त्यांच्या एजंट बनू पाहत असलेल्या महापालिका शहरातील सामान्य रहिवाशांचा बळी का बरं देत आहेत.याचे उत्तर शासन व महापालिका प्रशासन यांना द्यावे लागणार आहे.या उलट शहरात उलट सुलट चर्चेला हि उधाण आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More