विधीचे अर्ध्याधिक विद्यार्थी नापास! फेरपरीक्षेस परवानगी नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई शिक्षण

विधीचे अर्ध्याधिक विद्यार्थी नापास! फेरपरीक्षेस परवानगी नाही

मुंबई – शासकीय विधी महाविद्यालयाच्या (GLC) शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या २७० पैकी १५० विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत नापास करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांना पेपर फेरतपासणी आणि फेरपरीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी तब्बल ५ तास प्राचार्यांच्या केबिनबाहेर वाट पहिली मात्र सिक्युरिटीकडून त्यांना वारंवार तिथून जाण्यास सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये आता वार्षिक निकालाबाबत चिंता निर्माण झाली आहे. कारण या परीक्षेची फेरतपासणी झाली नाही अथवा फेरपरीक्षा घेण्यात आली नाही आणि निकाल असाच राहिला तर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. त्यामुळे आपले हे पूर्ण वर्ष वाया जाईल अशी भीती या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

‘इतके विद्यार्थी नापास होणे अशक्य आहे आणि आम्हाला उत्तरपत्रिका पाहण्याची परवानगी दिली जात नाही आहे’ – विद्यार्थी 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More