विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर – कोकणात होऊ घातलेल्या बहुचर्चित ‘नाणार’ प्रकल्पाविरोधात विरोधी पक्षांनी आजही विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात नाणारला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. नाणार प्रकल्प रद्द करण्याची विरोधकांची भूमिका घेतली. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करत दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान सरकारला विधेयके मंजूर करून घेण्यासाठी या तिन्ही राजकिय पक्षांनी सहकार्य केले.

नाणार प्रश्नी बुधवारपासून शिवसेनेनेही कालची आक्रमक भूमिका आजही कायम ठेवली. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या सर्वच आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार जाणार असल्याच्या घोषणा देण्यात येत होती. यामुळे सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब करत अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, या गोंधळातच सहकार विभागाचे पुर्नस्थापना विधेयक, शिक्षण विभागाचे विद्यापीठ विधेयक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते महामार्ग विधेयक, वित्त विभागाचे विनियोजन विधेयक यासह पाच विधेयक राज्य सरकारने मंजूर करून घेतले. विशेष म्हणजे काँग्रेसने सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे जाहीर करूनही या तिन्ही पक्षांनी विधेयके मंजूर करण्यासाठी सहकार्य केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीला चाकूने भोसकले

मुंबई- विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणे एका 39 वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करणार्‍या या व्यक्तीला तरुणानेच चाकूने भोसकले. त्यात फिरोज नियास खान हा...
Read More
post-image
News मुंबई

ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा महसूल बुडविणार्‍या 11 जणांना अटक! कॅशसहित इतर मुद्देमाल जप्त

मुंबई- ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अकरा जणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सात ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई करून एक लाख...
Read More
post-image
News देश निवडणूक

मध्य प्रदेशचे कमलनाथ नवे मुख्यमंत्री

भोपाळ – विधानसभा निवडणुकांत यश मिळवल्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज दिवसभर जोर बैठका...
Read More
post-image
News देश

योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगावी-अखिलेश यादव

लखनऊ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण...
Read More
post-image
News मुंबई

ईदला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन! लाऊडस्पीकरचा आवाज वाढला

मुंबई -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने आदेश देवूनही राज्यात ध्वनिप्रदूषण होत असताना तक्रार देऊनही राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने आज तीव्र...
Read More