विधानभवनात आ. गजभियेंची भिडेंच्या वेशात एन्ट्री ! – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मंत्रालय राजकीय

विधानभवनात आ. गजभियेंची भिडेंच्या वेशात एन्ट्री !

नागपूर –  आजपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांचे वेश धारण करत हातात आंब्याने भरलेली टोपली घेऊन विधानभवनात एन्ट्री केली. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत विधिमंडळाच्या परिसरात सत्ताधारी आमदारांना आंब्याचे वाटप केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजचा पहिला दिवस असून या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळ परिसरात दाखल झाले. संभाजी भिडे यांच्यावर जाणूनबुजून कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. यासाठीच प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधिमंडळात पोहोचले. सरकारवर टीका करताना गजभिये म्हणाले की, ‘संभाजी भिडे यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्य सरकार लोकांना न्याय देण्यात कमी पडत आहे’. आंधळ्या, मुकबधीर सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आलो आहोत, संभाजी भिडे यांच्यावर जाणूनबुजून कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More